Join us  

'पॅण्ट घालायला विसरली का?'; एअरपोर्ट लूकमुळे मान्यता दत्त झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 4:18 PM

Maanayata dutt: सध्या सोशल मीडियावर मान्यताचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कलाविश्वात सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबियांची कायमच चर्चा रंगत असते. यात सध्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता हिची चर्चा रंगली आहे. मान्यता कायम तिच्या फॅशनसेन्स आणि लक्झरी लाइफस्टाइमुळे चर्चेत येत असते. परंतु, यावेळी एक हटके फॅशन केल्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

सध्या सोशल मीडियावर मान्यताचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मान्यताने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मान्यताने एक शॉर्ट लूज स्टाइल शर्ट ड्रेस परिधान केला होता. तिचा हा ड्रेस पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल करत पॅण्ट घालायची विसरलीस का? असा प्रश्न विचारला आहे. इतकंच नाही तर तिच्या व्हिडीओवर ट्रोलिंगचा पाऊस पडला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

पॅण्ट घालायला विसरली का? असं एका युजरने म्हटलं आहे. तर, शर्टाखाली काही तरी घालायचं असतं, मान्यता तुला हे कपडे शोभून दिसत नाहीयेत, जरा चांगले वाटतील असे कपडे घाल, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.दरम्यान, मान्यता आणि संजय यांचं लव्हमॅरेज आहे. मान्यता संजयपेक्षा १९ वर्षांनी लहान आहे. वयाच्या ५० व्या वर्षी तिसरं लग्न करणाऱ्या संजयला दोन मुलंदेखील आहेत. 

टॅग्स :संजय दत्तबॉलिवूडसेलिब्रिटी