बॉलिवूडचा 'बाबा' अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे संजय दत्त. संजूबाबा अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. संजय दत्तने अलीकडच्या काळात KGF 2, 'लिओ' यांसारख्या साउथ सिनेमांमध्येही काम केलं असल्याने त्याची भारतात क्रेझ आहे. अलीकडेच, सोशल मीडियावर संजूबाबाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका खास अंदाजात दिसत आहेत. व्हाईट रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केलेल्या संजय दत्तला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.संजूबाबाच्या स्वॅगवर नेटकरी फिदा
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संजय दत्त आपल्या चाहत्यांशी बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो त्याच्या गळ्यातील चेन दाखवून "हे बघतोयस का? हे बघ, हे बघ, पन्नास तोळे" असे म्हणताना दिसत आहेत. 'वास्तव' सिनेमातील हा डायलॉग ऐकल्यावर चाहतेही "पन्नास-पन्नास" असं ओरडताना ऐकू येत आहेत. संजय दत्तचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, चाहते त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी "संजू बाबा ऑन टॉप", "बाबाचा अनोखा स्वॅग" अशा कमेंट्स केल्या आहेत. संजूबाबाने चाहत्यांसोबत साधलेला हा प्रेमळ संवाद सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
संंजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, अलीकडेच त्याची खलनायकी भूमिका असलेला 'बागी ४' हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमात संजूबाबाचा रक्तरंजित अवतार आणि जबरदस्त अभिनय चर्चेत आहे. 'बागी ४'मध्ये संजय दत्त आणि टायगर श्रॉफ एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. याशिवाय काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या हाउसफुल्ल ५ या सिनेमात संजय दत्त कॉमेडी करताना पाहायला मिळाला. संजय दत्तच्या आगामी सिनेमाबद्दल इतक्यात कोणतीही अपडेट समोर नाही