Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कांटे'च्या लूकमध्ये संजय दत्तने सुरु केली या चित्रपटाचे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 10:39 IST

संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे. नुकताच त्यांने कलंक चित्रपट साईन केला आहे. कलंकच्या माध्यमातून तब्बल 21 माधुरी आणि संजय दत्त एक चित्रपटात दिसणार आहेत.

संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे. नुकताच त्यांने कलंक चित्रपट साईन केला आहे. कलंकच्या माध्यमातून  तब्बल 21 माधुरी आणि संजय दत्त एक चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय संजय दत्त त्याच्या आणखीन एक चित्रपटाला घेऊन चर्चेत आहे. सोशल मीडियावर संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  संजय दत्तने आगामी चित्रपट 'टोरबाज'चे शूटिंग सुरु केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मलिक करतो आहे. सेटवरचे काही फोटो संजय दत्तने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. संजयने नुकतेच किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये शूटिंग करतो आहे. यात संजय दत्त त्याच्या जुन्या अंदाजात दिसतो आहे. संजय दत्तचा या चित्रपटातील लूक बघून आपल्याला कांटे चित्रपटातील आठवण आल्याशिवाय राहत नाही.  टोरबाजमध्ये संजय दत्त एका सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जो मुलांना लढाईची प्रेरणा देतो. टोरबाज हे अफगणिस्थानमध्ये असून, यामध्ये अफगाणिस्थानातील आत्मघाती मुलांची व्यथा मांडण्यात येणार आहे. यात संजय दत्तशिवाय नर्गिस फाखरी, राहुल देव आणि राहुल मित्रा यांच्यादेखील भूमिका आहेत. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्यात संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळ्या शेड्स दाखवण्यात येणार आहेत. टीझरमध्ये रणबीर कपूरने साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेची प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. स्वत: संजय दत्त रणबीरचा अभिनय पाहुन थक्क झाला होता. रणबीरचा या चित्रपटातील अभिनय त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. राजकुमार हिराणी यांनी आधी या चित्रपटाचे नाव दत्त ठेवण्यात आले होते मात्र त्यानंतर नर्गिस या संजय दत्तला 'संजू' या नावाने हाक मारत असल्याने चित्रपटाचे नाव 'संजू'चे ठेवण्यात आले.