बॉलिवूडमध्ये धूमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो व व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकीचं एक व्हिडिओ आहे तो संजय दत्तचा. या व्हिडिओत संजय दत्त आपल्या कुटुंबासोबत दिवाळी पार्टी साजरा करतांना दिसतोय. पण या व्हिडिओतील संजू बाबाचे वागणे अनेकांना खटकले आहे. होय, व्हिडिओत तो मीडियाच्या फोटाग्राफर्ससाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना दिसतो आहे.
मीडियाचे फोटोग्राफर्स यानंतरही जात नाही म्हटल्यावर तो आणखीच संतापतो आणि फोटोग्राफर्सला शिव्या देताना दिसतो. घरी जा ना, तुमच्या घरी दिवाळी नाही का, असे तो तावातावात म्हणतो. मीडियाला शिव्या दिल्यानंतर तो घरात जातो आणि यानंतर लगेच संजूबाबाच्या घराच्या बाहेरचे दिवे बंद होतात.तूर्तास संजय दत्त तोरबाज, प्रस्थानम, कलंक, पानीपत अशा अनेक चित्रपटांत बिझी आहे.