Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी दु:खाशी मैत्री केलीय...!  संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 16:56 IST

एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्रिशाला आयुष्यातील दु:खद प्रसंग व त्यातून आलेल्या अनुभवांवर बोलली.

ठळक मुद्देत्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे.

 2 जुलै 2019 रोजी संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. बॉयफ्रेन्डच्या अनपेक्षित मृत्यूने त्रिशाला कमालीची  खचली होती. अद्यापही ती यातून सावरू शकलेली नाही. आता तर तिने दु:खाशी मैत्री केलीये. होय, एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्रिशाला आयुष्यातील दु:खद प्रसंग व त्यातून आलेल्या अनुभवांवर बोलली.

एक भलीमोठी पोस्ट लिहित तिने स्वत:ला व्यक्त केले. तिने लिहिले, ‘आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दु:ख सहन करावे लागू नये, यासाठी आपण सतसत झटत असतो. पण हे दु:खाचे प्रसंग बरेच काही शिकवूनही जातात. माझ्याबद्दल सांगायचे तर अशा प्रसंगाने मला नवा मार्ग मिळाला. हे प्रसंग वाट्याला आले नसते तर मी सामान्य आयुष्य जगत असते. आयुष्यातील वेदनेने मला शांतीने जगणे शिकवले. दु:खापासून सुटका करण्याऐवजी मी त्याच्याशी मैत्री केली. दु:ख, वेदना संपवणे हे माझे लक्ष्य नाहीच. कारण ते निरंतर तुमच्या सोबत असतील. दु:खासोबत जगणे, दु:ख मॅनेज करणे हे माझे लक्ष्य आहे आणि आता मी ठीक आहे.’

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे. 2014 मध्ये तिने पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइन सुरू केली होती. न्युयॉर्कमधील जॉन जे कॉलेज  ऑफ क्रिमिनल जस्टिसमध्ये तिने कायद्याची पदवी घेतलीय.

1987 मध्ये संजय दत्तने ऋचा शर्मासोबत लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म  1988 मध्ये झाला. ऋचा ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याने 10 डिसेंबर 1996 मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यूयॉर्कमध्ये मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्त नेहमी तिच्या संपर्कात असून, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. याशिवाय संजय दत्तची पत्नी मान्यतासोबतही तिचे चांगले संबंध आहेत.

टॅग्स :संजय दत्त