Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीच्या आरोपांवर संजना सांघीने दिले उत्तर, म्हणाली-  मी हे 25 वेळा मुलाखतीत सांगितले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 17:21 IST

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील गुंता दिवसंदिवस वाढतच चालला आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील गुंता दिवसंदिवस वाढतच चालला आहे. रिया चक्रवर्तीने दिलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखती दरम्यान रियाने दावा केला की,  'संजना सांघीने सुशांत सिंह राजपूतवर MeToo चा आरोप लावला होता. ही बातमी समोर येताच सुशांत सिंह राजपूत टेन्शनमध्ये आला होता. तो जिथेह जात होता तिथे त्याला मी टू आरोपांबाबत विचारले जात होते. या बातम्यांनी सुशांतला पूर्णपणे चिंतेत टाकले होते. सुशांतने संजना सांघीसोबत असं काहीही केलं नव्हतं. ज्यामुळे त्याला इतकं प्रताडित केलं गेलं'. संजना सुशांतच्या अपोझिट 'दिल बेचारा' सिनेमात काम केले. 'दिल बेचारा' सिनेमाच्या शूटींगदरम्यान सुशांत सिंह राजपूतवर मीटूचा आरोप लावला होता. नंतर संजना सांघीने दावा केला होता की, तिने सुशांतवर अशाप्रकारचा कोणताही आरोप लावला नाही.

संजना सांघीचे रियाला उत्तर 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रियाने केलेल्या आरोपांवर संजना म्हणाली, ''खरं सांगायचं तर एक स्त्री, म्हणून मी खूप काही बोलले आहे. वास्तविक मला विषयावर आता बोलायचं नाही. मी या विषयावर 25 हून अधिक मुलाखतींमध्ये बोललो आहे आणि आता माझ्याकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही.'' 

सुशांतला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती आजतकसोबत बोलताना रिया चक्रवर्तीने यूरोप ट्रिपच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, यूरोपच्या ट्रिपवर जेव्हा आपण जात होतो, तेव्हा सुशांतने सांगितले होते की, त्याला क्लॉस्ट्रोफोबिया होता त्यामुळे त्याला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती वाटते. सुशां त्यासाठी तो एक औषध घेत होता. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाइटआधी त्याने ते औषध घेतलं. कारण ते औषध त्याच्याकडे नेहमी राहत होतं.

 एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने दिलं रियाला चोख उत्तर अंकिताने इन्स्टाग्रामवर सुशांतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सुशांत प्लेन उडवताना दिसतोय. कॅप्शनमध्ये अंकिता लिहिते, ''हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे का?, तुला नेहमीच उडायचे होते आणि तू ते केलंस सुद्धा.'' सुशांतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे.

सुशांतचे पाय होते तुटलेले तर गळ्याभोवती सुईच्या खुणा, हॉस्पिटलमधील स्टाफचा खळबळजनक खुलासा 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती