Join us

​सलमान खानच्या घरी का फिरकेनासी झाली संगीता बिजलानी? ‘खान’ कुटुंबाला का केले अनफॉलो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 11:42 IST

सलमान खान व संगीता बिजलानी म्हणजे एकेकाळचे प्रियकर-पे्रयसी. एकेकाळी दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते. खरे तर २७ मे १९९४ या ...

सलमान खान व संगीता बिजलानी म्हणजे एकेकाळचे प्रियकर-पे्रयसी. एकेकाळी दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते. खरे तर २७ मे १९९४ या तारखेला हे दोघे लग्न करणार असल्याचेही म्हटले जाते. पण ऐनवेळी हे लग्न फिस्कटले. हे लग्न फिस्कटण्यामागे सलमानच्या आयुष्यात सोमी अलीचा प्रवेश हे कारण मानले जाते. एका मुलाखतीत खुद्द संगीताने सलमानसोबतच्या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते. ‘लग्नासाठी सलमानने स्वत: २७ मे ही तारीख निवडली होती. कारण त्याला घरून परवानगी मिळाली होती. पण लग्नाच्या महिनाभराआधी काहीतरी गडबड असल्याचे मला जाणवले. मी सलमानला फॉलो करणे सुरु केले आणि सलमान लग्नाच्याच काय तर बॉयफ्रेन्ड बनण्याच्याही लायकीचा नाही, असे मला जाणवले. तो एक इमोशनली, टॉमेटिक आणि टेरिबल अनुभव होता,’ असे संगीताने सांगितले होते. यानंतर संगीता बिजलानीने क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीनसोबत लग्न केले होते.अर्थात संगीता व सलमानचे ब्रेकअप झाले, लग्न फिस्कटले. पण त्यांची मैत्री मात्र यानंतरही कायम होती. सलमानच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात संगीता आवर्जून दिसायचीच दिसायची. पण गेल्या काही दिवसांत संगीता सलमानच्या घराकडे फिरकलीही नसल्याचे कळतेय. सलमानच्या घरच्या इव्हेंटमधून संगीताचे अचानक गायब होणे, सगळ्यांनाच खटकणारे आहे. आता तर यामागचे कारणही समोर आले आहे. होय, चर्चा खरी मानाल तर सलमान व संगीताच्या मैत्रीत मतभेद निर्माण झाले आहेत आणि यामागे युलिया वंतूरचा (सलमानची कथित रोमानियन गर्लफ्रेन्ड. सध्या युलिया भारतातच मुक्कामाला आहे) हात आहे.ALSO READ: सलमान खान त्याच्या कथित गर्लफ्रेण्डसोबत झाला स्पॉट!!युलिया व संगीता एकाच जिममध्ये वर्कआऊट करतात. याठिकाणी एका क्षुल्लक कारणावरून युलियाने म्हणे जोरदार तमाशा केला.  यानंतर संगीताने युलियापासूनच नव्हे तर सलमानच्या कुटुंबापासूनही अंतर राखणे सुरु केले. संगीता सलमानला २०१६ च्या नोव्हेंबरमध्ये अखेरची भेटली होती. यानंतर संगीता सलमानच्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्यासोबत दिसली नाही. शुक्रवारी रात्री सलमानची बहीण अर्पिता खानच्या घरी दिवाळी पार्टी होती. या पार्टीतही संगीता नव्हती. केवळ इतकेच नाही तर संगीताने सोशल मीडियावरही खान कुुटुंबातील सगळ्यांना अनफॉलो केले आहे.