सलमानच्या वक्तव्याकडे एक वाद म्हणून पाहिले जाऊ नये - अरबाझ खानची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 12:09 IST
सलमानने केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात असंतोष निर्माण झाला असता, सलमानचे वडील सलीम खान यांच्या पाठोपाठ आता अरबाझ खानने सलमानची ...
सलमानच्या वक्तव्याकडे एक वाद म्हणून पाहिले जाऊ नये - अरबाझ खानची पाठराखण
सलमानने केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात असंतोष निर्माण झाला असता, सलमानचे वडील सलीम खान यांच्या पाठोपाठ आता अरबाझ खानने सलमानची पाठराखण केली आहे. सलमानचा विधानामागचा हेतू चुकीचा नव्हता, त्याच्या वक्तव्याकडे एक वाद म्हणून पाहिले जाऊ नये, असे अरबाझ म्हणाला.सलीम खान यांनीही सलमानच्या विधानावर माफी मागितली. अरबाझने मात्र सलमानची पाठराखण केली आहे. अरबाझ म्हणाला की, ह्यसलमान कोणत्या उद्देशाने बोलत होता ते फार जास्त महत्त्वाचे आहे. त्याच्या विधानामागचा हेतू नक्कीच वाईट नव्हता. चित्रीकरणावेळी आपल्या खांद्यावर जणू डोंगराऐवढे ओझे होते किंवा मला अगदी ओझे वाहणाºया गाढवासारखे वाटत होते, असे सलमानला सांगायचे होते. मी येथे गाढव शब्द उदाहरण म्हणून वापरला मग आता प्राणीमित्र नाराज होणार का? काहीवेळेस तुम्हाला तुमच्या भावना प्रखरतेने पटवून देण्यासाठी उदाहरणे द्यावी लागतात. त्याकडे वाद म्हणून पाहू नये, पण नक्कीच विधान केल्यानंतर आपण केलेली तुलना योग्य नसल्याचे सलमानला कळून चुकले आहे. मात्र, याबाबत त्याने माफी मागवी की नाही हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे, असेही अरबाझ पुढे म्हणाला.