सलमानच्या चित्रपटात फवाद नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 12:20 IST
मध्यंतरी अशी माहिती आली होती की, सलमान खानच्या बॅनरमध्ये निर्मित आगामी चित्रपटात फवाद खान मुख्य भूमिकेत आहे. नितीन कक्कर ...
सलमानच्या चित्रपटात फवाद नाही!
मध्यंतरी अशी माहिती आली होती की, सलमान खानच्या बॅनरमध्ये निर्मित आगामी चित्रपटात फवाद खान मुख्य भूमिकेत आहे. नितीन कक्कर याचे दिग्दर्शक असणार असून ती एक शहरी प्रेमकथा असल्याचेही बोलले जात होते.परंतु नितीनने याचे खंडन करत सांगितले की, माझ्या पुढील चित्रपटात फवाद खानची निवड करण्यात आली नाही. कोणी तरी मीडियाला ही खोटी माहिती दिली असून मी कोणत्याही शहरी प्रेमकथेवर काम करीत नाहीए.हे जरी खरे असले की, मी सलमान खानच्या प्रोडक्शनसाठी चित्रपट बनवत आहे मात्र, अद्याप कोणत्याही कलाकाराची निवड करण्यात आलेली नाही. ती जशी होईल तसे आम्ही स्वत:हून याची माहिती देऊ.आता नितीनने असे जाहीर करण्यामागे सध्या पाकिस्तानी कलाकरां विरोधात तापत असलेले वातावरण तर नाही ना? असो, नितीन कोणाची निवड करतो हे येत्या काही दिवसांत कळेलच.