Join us

​सलमानचे नखरे झेलता झेलता आॅलिम्पिक संघाच्या नाकीनऊ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 17:29 IST

‘सुलतान’चे शूटींग आणि प्रमोशनदरम्यान सलमान खानने देशात खेळांना प्रोत्साहन मिळावे,अशी मागणी करून टाकली. याचा परिणाम म्हणजे भारतीय आॅलिम्पिक संघाने ...

‘सुलतान’चे शूटींग आणि प्रमोशनदरम्यान सलमान खानने देशात खेळांना प्रोत्साहन मिळावे,अशी मागणी करून टाकली. याचा परिणाम म्हणजे भारतीय आॅलिम्पिक संघाने सलमानला गुडविल अ‍ॅम्बेसिडर नेमले. यावरून पुढे वादही झाला आणि या वादामुळे सलमान आणि सलमानच्या ‘सुलतान’ला फुकटची प्रसिद्धीही मिळाली. मात्र यासगळ्यांमध्ये आपल्या एका जाहिरातीच्या शूटसाठी सलमानचा वेळ मिळावा, यासाठी आॅलिम्पिकसंघाला चार महिने प्रतीक्षा करावी लागली. येत्या शुक्रवारपासून(५ आॅगस्ट) रिओ आॅलिम्पिक स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गत ३० जुलैला सलमानने आॅलिम्पिक संघासाठी एका जाहिरातीचे शूट पूर्ण केले. सलमानच्या घरानजिकच्याच एका स्टुडिओमध्ये या जाहिरातीचे शूट झाले. पण या शूटसाठी सलमान तब्बल तीन तास उशीरा पोहोचला. एवढेच नव्हे तर स्टुडिओत पोहोचल्यावरही सुमारे दोन तासानंतर त्याने जाहिरातीचे शूटींग सुरु केले. शेवटी हे नखरे नाही तर आणखी काय??