सलमान म्हणाला, ‘मैं इंडियन हूं’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 05:40 IST
अवैध शिकारीसंदर्भातील एका प्रकरणात अभिनेता सलमान खान आज गुरुवारी जोधपूर न्यायालयात हजर झाला. मी निर्दोष आहे, असे बयान सलमानने ...
सलमान म्हणाला, ‘मैं इंडियन हूं’
अवैध शिकारीसंदर्भातील एका प्रकरणात अभिनेता सलमान खान आज गुरुवारी जोधपूर न्यायालयात हजर झाला. मी निर्दोष आहे, असे बयान सलमानने न्यायालयासमक्ष दिले. गतवेळीप्रमाणे याही सुनावणीत न्यायाधीशांनी सलमानला जातीबाबत विचारले. यावर ‘मैं इंडियन हूं’ असे उत्तर सलमानने दिले. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’च्या चित्रीकरणादरम्यान अवैध शस्त्रास्त्रांनी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. या प्रकरणाची आज सुनावणी झाली. सर्व साक्षीदारांनी तुझ्याविरूद्ध साक्ष्य दिली आहे, असे न्यायाधीशांनी म्हटल्यावर मी निर्दोष आहे, असे सलमानने सांगितले. एका वृत्तपत्राने याप्रकरणी वाढवून चढवून लिहिले. यानंतर वनविभाग आणि मीडियाच्या दबावामुळे माझ्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. माझ्याजवळ मी निर्दोष असल्याचे पुरावे आहेत, असेही सलमानने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ एप्रिलला होणार आहे, तेव्हा बघू यात पुढे काय होते ते!!