‘सलमानने बलात्कार पिडीत महिलेशी केली स्वत:ची तुलना’’ , सोशल मीडियावर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 15:00 IST
सलमान सुलतानच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. दरम्यान त्याला 'सुलतान' चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका निभावणं किती कठीण गेले ? असा प्रश्न ...
‘सलमानने बलात्कार पिडीत महिलेशी केली स्वत:ची तुलना’’ , सोशल मीडियावर जोरदार टीका
सलमान सुलतानच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. दरम्यान त्याला 'सुलतान' चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका निभावणं किती कठीण गेले ? असा प्रश्न विचारला असता. 'सहा तास सलग शुटींग करताना अनेक वेळा मैदानावर उचलणं, आपटणं चालू असायचं. मला हे फारच कठीण गेलं. कारण १२० किलो वजनाच्या व्यक्तीला मला १० वेळा आणि तेदेखील १० वेगवेगळ्या अँगलने उचलावे लागायचे, असे तो म्हणाला.तसेच मलादेखील उचलून जमिनीवर आपटलं जायचे. खºया खेळात अशाप्रकारे पुनरावृत्ती केली जात नाही. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचे. रिंग बाहेर पडल्याने मला सरळ चालणे शक्य व्हायचे नाही. काहीतरी खायचो आणि ट्रेनिंगसाठी जायचो, हे सलमानचे बोलणे आणि बलात्कार पिडीत महिलेचा केलेला उल्लेख अनेकांना रुचलेला नाही.अभिनेता सलमान खान याने वादग्रस्त ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात तीव्र आणि संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. सलमानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली आहे. तसे त्याने ट्विट केले आहे.