Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान माझा विकनेस नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 17:27 IST

 कॅटरिना कैफने बॉलीवूडमध्ये ‘मैने प्यार क्युँ किया’ द्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर एकामागोमाग तिला चित्रपट मिळत गेले आणि आज ...

 कॅटरिना कैफने बॉलीवूडमध्ये ‘मैने प्यार क्युँ किया’ द्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर एकामागोमाग तिला चित्रपट मिळत गेले आणि आज ती बॉलीवूडच्या हॉट आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक समजली जाते.तिचे सलमानसोबतचे चित्रपट बरेच असल्याने तिला सलमानबद्दलच्या नात्याविषयी विचारले तेव्हा कॅट म्हणते,‘ आमची जोडी फार वेगळी आहे असे काही नाही. पण नंतर नंतर आमच्यावर चित्रपट काढण्यास निर्मात्यांना विचार करावा लागला.सलमान काही माझा भाग नाही. त्यामुळे तो माझा वीकनेस असणे कसे शक्य आहे. माझे फक्त माझे काम आणि फिटनेसवरच लक्ष असते. माझ्या वैयक्तिक जीवनाशी त्याचा काय संबंध? आपण भविष्याबद्दल काहीच सांगू शकत नाही ना? ’