सलमान-लुलिया एकाच गाडीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:56 IST
सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. त्याच्या विविध प्रेम प्रकरणांचीही चर्चा कायम सुरू असते. सध्या ...
सलमान-लुलिया एकाच गाडीत...
सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. त्याच्या विविध प्रेम प्रकरणांचीही चर्चा कायम सुरू असते. सध्या त्याचे नाव लुलिया वंटूर हिच्याशी जोडले जात आहे. याला कारणही तसेच आहे. लुलिया ही सलमान व त्याच्या कुटुंबियांसोबत अनेकवेळा फोटोतही झळकली आहे. पण अलिकडेच मुंबईतील जुहू विभागात ती सलमानसोबत त्याच्या गाडीत बसलेली दिसली. अर्थात सलमान पुढच्या सीटवर बसला होता आणि लुलिया मागील सीटवर. काहीही असो मात्र दोघांत काहीतरी नक्कीच सुरू आहे. सलमान हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर समजला जातो. अशावेळी सलमान आणि लुलिया रात्रीच्यावेळी एकत्र दिसत असतील तर चर्चा तर होणारच ना!