Join us

वरुण धवन पूर्ण करणार का सलमान खानची 'ही' इच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 14:34 IST

वरुण धवनचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'जुडवा 2' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 1997 साली ...

वरुण धवनचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'जुडवा 2' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 1997 साली आलेल्या सलमान खानच्या जुडवाचा रिमेक आहे. यात वरुण धवन डबल रोलमध्ये दिसणार आहे.ऐवढेच नाही तर काही दिवसांपासून चर्चा होती की सलमान खानचा चित्रपट 'अंदाज अपना अपना'चा पण रिमेक तयार करण्यात येणार आहे. मात्र ही केवळ एक अफवा होती. सलमान खानला या चित्रपटाचा रिमेक तयार करायचा नाही आहे. त्याला आपल्या दुसऱ्या एक चित्रपटाचा रिमेक तयार करण्याची इच्छा आहे. लव्ह या चित्रपटाचा रिमेक सलमानला तयार करायचा आहे. यात वरुण धवनने काम करावे असे सलमानचे म्हणणे आहे. याचित्रपटात सलमानच्या अपोझिट रेवती दिसली होती. 'लव्ह' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नसला तरी सलमानच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. ALSO READ : Don't miss : पाहा, ‘जुडवा2’चा धमाकेदार ट्रेलर...!!सलमान खानच्या लव्हमधील भूमिकेसाठी वरुण धवन परफेक्ट असल्याचे सलमान खानचे मत आहे. वरुण धवन सलमान खानसोबत जुडवा 2मध्ये दिसणार आहे. याचित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करतोय तर याचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केलीय. डेविड धवन यांनी जुडवाच्या पहिल्या पार्टचे पण दिग्दर्शन केले होते. 'जुडवा 2'मध्ये वरुण धवनसह जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. तब्बल १९ वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वल पुन्हा तयार करण्यात येत आहे.‘उंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन...’ही दोन गाजलेली गाणीही ‘जुडवा2’मध्ये दिसणार असल्याचे कळतेय.