थरार, रोमांच निर्माण करणारा सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चा पहा ट्रेलर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 16:07 IST
सलमान खान याच्या बहुचर्चित ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २५ जून रोजी रिलीज होणार आहे.
थरार, रोमांच निर्माण करणारा सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चा पहा ट्रेलर!!
सलमान खान याच्या बहुचर्चित ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २५ जून रोजी रिलीज होणार आहे. असो या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांमध्ये रोमांच निर्माण करणारा आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शाहरूख खान कॅमिओ करणार आहे. त्यामुळे बºयाच कालावधीनंतर प्रेक्षकांना शाहरूख-सलमानला एकत्र पडद्यावर बघण्याचा आनंद मिळणार आहे. सलमान खान प्रॉडक्शन अंतर्गत बनविलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही बघाल तर दंग होऊन जाल. ट्रेलरमध्ये सुरुवातीला एक मोकळे मैदान दिसत असून, आजूबाजूला हिरवळ पसलेली दिसत आहे. रेडिओवर सुमधुर संगीत सुरू असून, तेथेच झोपलेला पवन गाणं गुणगुणत आहे. अचानकच एक जोरात आवाज येतो अन् चोहीकडे अंधार पसरतो. तेव्हा एका मुलीचा (जू जू) आवाज येतो, जी पवनला सांगते की, मी खूप लांबून आली आहे; मला येथून बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नाही, मला मदत कर! मात्र त्या मुलीचे बोलणे पवनच्या अजिबात लक्षात येत नाही. कारण ती मुलगी चायनीज भाषेत तिची व्यथा सांगत असते. अशातही पवन त्या मुलीची मदत करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार होतो. वास्तविक त्याला तिचे नावही माहीत नसते. त्यानंतर अचानकच सर्वकाही सीरियस वातावरण निर्माण होते. जसे दोन देशांमध्ये (भारत आणि चीन) युद्ध होते तसे वातावरण निर्माण होते. पवनच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहत असताना दिसतात अन् ब्रॅकग्राउंडमध्ये प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते, असे दाखविले जात आहे. त्यानंतर एखाद्या खलनायकाप्रमाणे शाहरूखच्या हसण्याचा आवाज ऐकायला येतो. आतापर्यंतच्या आम्ही सांगितलेल्या कथेवरून एकच लक्षात येते की, चित्रपटात शाहरूख आणि सलमानमध्ये दुश्मनी दाखविण्यात आली असावी. आता तुम्ही जास्त आतुर न होता, लगेचच चित्रपटाचा ट्रेलर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की, आम्ही एवढी कथा का रंगवून सांगत आहोत. आश्चर्य वाटले ना? मित्रांनो कदाचित तुम्हाला माहीत असेल की, आज एप्रिल महिन्याची पहिली तारीख आहे. त्यामुळे असा ट्यूबलाइटचा ट्रेलर असूच शकत नाही. केवळ एप्रिलफूल करण्यासाठीच आम्ही तुम्हाला ट्रेलरची कथा रंगवून सांगितली. मात्र जेव्हा ट्रेलर रिलीज होणार तेव्हा तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहचविणार हेही तेवढेच खरे आहे. एप्रिलफूलच्या निमित्ताने ‘स्माइल तो बनती हैं’