सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’चा आगळा-वेगळा कारनामा! आले खास इमोजी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 15:45 IST
लवकरच सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता सलमानचा चित्रपट येणार म्हटल्यावर कुणाला ठाऊक नसेल? पण ...
सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’चा आगळा-वेगळा कारनामा! आले खास इमोजी!!
लवकरच सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता सलमानचा चित्रपट येणार म्हटल्यावर कुणाला ठाऊक नसेल? पण आम्ही देणार आहोत, ही बातमी तुम्हाला कदाचित ठाऊक नसावी. होय, या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानचे खास इमोजी आता ट्विटरवर वापरता येणार आहे. ‘ट्युबलाईट’चा दिग्दर्शक कबीर खान याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देत हा इमोजी लॉन्च केला आहे. मला हे सांगताना फार आनंद होत आहे की,‘ट्युबलाईट’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे ज्याचे कॅरेक्टर इमोजी आहे, असे ट्विट कबीरने केले आहे. सलमाननेही कबीरचे हे टिष्ट्वट रिटिष्ट्वट केले आहे. विशेष म्हणजे, गळ्यात बूट अडकवलेला सलमानचा हा इमोजी अगदी काही तासांत प्रचंड लोकप्रीय झाला आहे. अनेक जण त्यांच्या ट्विटमध्य ते वापरत आहेत. हे इमोजी तुम्हीही ट्राय करायला हरकत नाही. शिवाय आपल्या मित्रांना याबद्दल सांगायलाही हरकत नाही. }}}}कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेला ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा इंडो-चायना युद्धावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. आतापर्यंत हा टीजर १७ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. या चित्रपटात सलमान अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी बराचसा वेळ घेतो. त्यामुळेच त्याला ‘ट्युबलाईट’ असे म्हटले जाते. त्याव्यतिरिक्त चित्रपटात दोघा भावांमधील प्रेम दाखविण्यात आले आहे. सलमानसोबत सोहेल खानही या चित्रपटात झळकणार असून, चायनीज कलाकार जू जू हिचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट येत्या ईदला रिलीज होणार आहे.