Join us

सलमान खानची जामिनावर सुटका होताच चाहत्यांचा नाशिकमध्ये जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 19:20 IST

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची जामिनावर सुटका होताच नाशिकमध्ये त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चाहत्यांनी केक कापून आनंद साजरा केला. ...

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची जामिनावर सुटका होताच नाशिकमध्ये त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चाहत्यांनी केक कापून आनंद साजरा केला. शहरातील कॉलेजरोड परिसरात चाहत्यांनी हा जल्लोष केला. सकाळपासूनच चाहत्यांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागून होते. दुपारी सलमानला जामीन मंजूर झाल्यानंतर तो केव्हा कारागृहाबाहेर येतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते. दरम्यान, सलमान बाहेर आल्याची बातमी समोर येताच चाहत्यांनी ढोल-ताशाच्या गजरात आनंद साजरा केला. दरम्यान, सलमानच्या जामीन अर्जावरील सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. मुंबईमध्ये त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी अक्षरश: गर्दी केली होती. सध्या सलमान जोधपूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून, रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. याठिकाणी पोहोचल्यानंतर तो चाहत्यांचे आभार मानणार काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. परंतु सलमान सुटल्यामुळे देशभरात त्याच्या चाहत्यांकडून जल्लोष केला जात आहे. नाशिकमध्येही चाहत्यांनी ‘आय लव यू सलमान’ अशा घोषणा देत जल्लोष केला. कॉलेजरोड परिसरात चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांनी केक कापून एकमेकांना भरविला. त्याचबरोबर ढोल-ताशाच्या गजरात डान्सही केला.