हुमाला सलमानच्या घरी ‘नो एन्ट्री’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 16:07 IST
काही दिवसांपूर्वीपर्यंत हुमा कुरैशी सलमान खानच्या कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात हजर असायची. खान कुटुंबांतील सदस्य असावी, इतपत हुमा त्यांच्यात मिसळू ...
हुमाला सलमानच्या घरी ‘नो एन्ट्री’?
काही दिवसांपूर्वीपर्यंत हुमा कुरैशी सलमान खानच्या कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात हजर असायची. खान कुटुंबांतील सदस्य असावी, इतपत हुमा त्यांच्यात मिसळू लागली होती. खान कुटुंबाकडे कुठलाही कार्यक्रम असो, हुमाला त्याचे निमंत्रण असायचेच असायचे. मात्र आता सूत्रांनी दिलेली बातमी खरी मानाल तर, खान फॅमिलीने हुमाला आपल्या घरी येण्यास बंदी घातली आहे. हुमा ही सलमानची बहीण अर्पिता खान हिचीही चांगली मैत्रिण होती. मात्र अर्पिता आई बनल्यानंतरच्या अनेक कार्यक्रमात हुमाला निमंत्रण नव्हते. आता यामागचे कारण काय? तर सोहेल खान. होय, सोहेल व हुमाची जवळीक अलीकडे भलतीच वाढली होती. इतकी की, सोहेलची पत्नी सीमा हिने याचमुळे घर सोडून जाण्याची धमकी दिली होती. मात्र सलमानच्या मध्यस्थीमुळे सीमा थांबली आणि तिने सोहेलला घराबाहेर काढले. काही दिवस सोहेल हॉटेलात राहिला. पण आता खान कुटुंबाने हे प्रकरण पूर्णत: निकाली काढण्याचे ठरवले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे हुमाला केली गेलेली ‘नो एन्ट्री’...