Join us

बिग बजेट भोजपुरी सिनेमा! सलमान खानच्या ‘राधे’चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 18:30 IST

Radhe: Your Most Wanted Bhai Trailer :  सलमानच्या दर्दी चाहत्यांनी ‘राधे’चा ट्रेलर डोक्यावर घेतला. पण अनेकांना मात्र हा ट्रेलर पाहून वॉन्टेड, दबंग आणि किक या त्याच्या जुन्या सिनेमांचीच आठवण झाली. 

ठळक मुद्दे13 मे 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार, अशी कमिटमेंट सलमानने केली आहे आणि तो आपली ही कमिटमेंट पूर्ण करणार आहे. येत्या 13 मे रोजी थिएटर आणि ओटीटी अशा दोन्हींवर हा सिनेमा एकाचवेळी रिलीज होतोय.

चाहते दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आणि सलमान खानच्या  (Salman Khan) ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला. (Radhe: Your Most Wanted Bhai Trailer Out) प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सलमानशिवाय दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा यांच्या मुख्य भूमिका आहेत. सलमानचे दर्दी चाहते असलेल्यांनी ‘राधे’चा ट्रेलर डोक्यावर घेतला. पण अनेकांना मात्र सलमानच्या सिनेमाचा हा ट्रेलर पाहून वॉन्टेड, दबंग आणि किक या त्याच्या जुन्या सिनेमांचीच आठवण झाली. मग सोशल मीडियावर प्रतिक्रिया तर उमटणारच.

सलमानचे तेच ते चावून चावून चोथा झालेले डायलॉग, चेह-यावरचे तेच ते भाव आणि थोड्या फार फरकाने तीच ती अ‍ॅक्शन पाहून लोक निराश झालेत. रेस 3, भारत, किक, वॉन्टेड या सिनेमांचे डिलीटेड सीन्स मिक्स करून हा ट्रेलर बनवला की काय, अशी शंकाही अनेक नेटक-यांना आली. काहींनी तर हा ट्रेलर पाहून बिग बजेट भोजपुरी कंटेन्ट अशी कमेंट केली.

एकंदर काय तर राधेच्या ट्रेलरने बहुतेकांची निराशा केली.  सिनेमा पाहून लोकांच्या काय रिअ‍ॅक्शन उमटतात ते दिसेलच. ट्रेलर इतका सिनेमा निराशाजनक असू नये, अशी प्रार्थना त्यामुळे आत्ताच केलेली बरी...  

13 मे 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार, अशी कमिटमेंट सलमानने केली आहे आणि तो आपली ही कमिटमेंट पूर्ण करणार आहे. येत्या 13 मे रोजी थिएटर आणि ओटीटी अशा दोन्हींवर हा सिनेमा एकाचवेळी रिलीज होतोय.

ट्रेलरमध्ये सलमान  दमदार एन्ट्री करताना दिसतो. मुंबईत ड्रग्जचा बिझनेस जोरात सुरू असतो. अशावेळी सलमान अर्थात राधे येतो आणि मुंबईतील ड्रग्ज माफियांचा सफाया करण्यासाठी कंबर कसतो. या ट्रेलरमध्ये सलमान 12 वर्षापूर्वीच्या राधेच्या अंदाजात दिसतो तर त्याच्या देहबोलीत ‘वॉन्टेड’ची छाप दिसते. जॅकी श्रॉफ यात सीनिअर आॅफिसर बनला आहे तर दिशा पाटनी ही जॅकीची बहीण दाखवलेली आहे. जी सलमानच्या प्रेमात वेडी झाली आहे. रणदीप हुड्डा यात ड्रग्ज कार्टेलचा बॉस बनला आहे. ‘राधे- द मोस्ट वॉन्टेड भाई’चा ट्रेलर पाहून तुम्हाला ‘वॉन्टेड’ या सिनेमाची आठवण येईल. यात सलमान त्याचे काही सुपरहिट डायलॉग्स पुन्हा एकदा ऐकवतो. जॅकलिन फर्नांडिसच्या आयटम सॉन्गची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

टॅग्स :सलमान खान