Join us  

ड्रग्स केसमध्ये सलमान खानचं नाव येताच लीगल टीमने दिलं 'हे' स्पष्टीकरण!

By अमित इंगोले | Published: September 23, 2020 11:30 AM

याआधी एनसीबीच्या चौकशीदरम्यान दीपिका पादुकोणचं नाव समो आलं आहे. दीपिका पादुकोणसोबतच ड्रग केसमध्ये सारा अली खान, रकुल प्रीतसहीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत.

वेगवेगळ्या मोठ्या बॉलिवूड स्टार्ससोबतच अभिनेता सलमान खान याचंही नाव ड्रग्स वादात समोर येताना दिसतंय.  सलमानच्या ड्रग्स कनेक्शनच्या बातम्या आल्यावर निर्मात-अभिनेता निखील द्विवेदीने लगेच या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं. तसेच या बातम्यांवरून त्याने मीडियावर आगपाखड केली. तसेच सलमान खानच्या लीगल टीमने लगेच यावर स्पष्टीकरण जारी केलं.

सलमान खानच्या लीगल टीमने दिलेल्या स्पष्टीकरणात लिहिले की, 'मीडियातील काही लोक खोट्या बातम्या प्रकाशित करत आहेत की, आमचे क्लाइंट सलमान खान, जे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांचं क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी प्रायव्हेट कंपनीत मोठी भागीदारी आहे. खरी बाब ही आहे की, सलमान खान यांचं क्वॉन किंवा कोणत्याही सहयोगी  कंपनीसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपाने कोणतीही भागीदारी नाही. आमची सूचना आहे की, मीडियाने आमच्या क्लाइंटबाबत कोणत्याही खोट्या बातम्या प्रकाशित करू नये'.

दरम्यान, एका न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली होती की, सलमान खानची क्वॉन टॅलेंट कंपनीत भागीदारी आहे. ज्यानंतर निखील द्विवेदीने ही बातमी खोटी असल्याचे सांगत न्यूज चॅनल्सला अशा बातम्या प्रसारित न करण्याचा सल्ला दिला. सलमान खान हा मोठा सुपरस्टार आहे आणि नंबर १ श्रेणीत येतो. अशात सलमानबाबत ही बातमी आल्याने सोशल मीडियात खळबळ उडाली होती.

याआधी एनसीबीच्या चौकशीदरम्यान दीपिका पादुकोणचं नाव समो आलं आहे. दीपिका पादुकोणसोबतच ड्रग केसमध्ये सारा अली खान, रकुल प्रीतसहीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर येत आहेत. त्यामुळे आता यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे पण वाचा :

दीपिका पदुकोणसह चार अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर!

ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोण लवकरच सादर करणार ऑफिशियल स्टेटमेंट

दीपिका-सारा-श्रद्धानंतर ड्रग्स प्रकरणात आले आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव, NCBच्या हाती पुरावे

टॅग्स :सलमान खानअमली पदार्थबॉलिवूड