१) ओम पुरी : दिवंगत अभिनेते ओम पुरी यांनी सलमानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ओम पुरी यांच्या अखेरच्या ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटातही सलमान त्यांच्यासोबत बघावयास मिळाला. जेव्हा सलमान ‘ट्यूबलाइट’चे प्रमोशन करीत होता तेव्हा त्याने सांगितले होते की, जेव्हा मी चित्रपटाचा व्हिडीओ बघतो तेव्हा मला असे वाटते की, ओम पुरी माझ्यासोबत आहेत. ओम पुरी यांचे ६ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
२) विनोद खन्ना : बॉलिवूडमधील सर्वाधिक हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या विनोद खन्ना यांनीदेखील या जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. विनोद खन्ना यांनी सलमानसोबत ‘दबंग’ आणि ‘दबंग-२’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. या दोन्ही चित्रपटांत विनोद खन्ना यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली.
३) रीमा लागू :रीमा लागू यांना तर बॉलिवूडमध्ये सलमान खानची आॅनस्क्रीन ‘मॉँ’ म्हणूनच ओळखले जात होते. राजश्री प्रॉडक्शनच्या जेवढ्या चित्रपटांमध्ये सलमान खानने काम केले, त्यातील बहुतांश चित्रपटात रीमा लागू यांनीच सलमानच्या आईची भूमिका साकारली. एककाळ तर असा होता की, रीमा यांना सलमानची आई म्हणूनच ओळखले जाऊ लागले. रीमा यांचे १८ मे रोजी निधन झाले.
४) इंदर कुमार : इंदर कुमार आणि सलमान खानमधील मैत्री तर सर्वश्रुत आहे. घनिष्ट मैत्रीमुळेच सलमान खानने इंदरला त्याच्या बºयाचशा चित्रपटांमध्ये संधी दिली. ‘वॉण्टेड’ आणि ‘तुमको न भूल पायेंगे’ हे चित्रपट तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सलमान आणि इंदर यांच्यातील नाते सख्ख्या भावाप्रमाणे राहिले आहे. सलमानने इंदरच्या वाईट काळात त्याला प्रचंड मदत केली. इंदरचे आज निधन झाले.
‘सीएनएक्स मस्ती’च्या वतीने यासर्व दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली; तसेच त्यांच्या परिवाराला कठीण प्रसंगात हिंमत मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!