Join us

​सलमान खानचा चुलबुल पांडे परतणार; ‘दबंग ३’ @ ईद २०१८

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 21:32 IST

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलमान खान चुलबुल पांडेच्या रूपांत पुन्हा एकदा येणार आहे.  ‘दबंग’ सिरीजचा तिसरा भाग ...

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलमान खान चुलबुल पांडेच्या रूपांत पुन्हा एकदा येणार आहे.  ‘दबंग’ सिरीजचा तिसरा भाग ‘दबंग ३’ कन्फर्म झाला आहे. सलमान खान  २०१८ सालच्या ‘ईद’ ला आपल्या चाहत्यांना भेट म्हणून ‘दबंग ३’ प्रदर्शित करणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०१७ साली सलमानचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत हे विशेष.‘दबंग’ या सिरीजचा तिसरा चित्रपट येणार असल्याचे निर्माता अरबाज खान याने सांगितले. दबंगच्या तिसºया पार्टचे नाव ‘दबंग ३’ असे असेल व तो ईद २०१८ ला प्रदर्शित केला जाईल.  सलमान खान व सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दबंग’चे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटात अरबाज खानची देखील भूमिका होती.सलमानच्या करिअरमध्ये दबंगचे महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगण्यात येते. २०१० साली दबंगचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता व बॉलिवूडमध्ये सलमानचे स्थान कमी झाले नसल्याचे सिद्ध झाले. यानंतर २०१२ साली दंबगचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. हा देखील पहिल्या भागाप्रमाणेच सुपर हिट ठरला होता. ‘दबंग’च्या यशामुळेच याचा तिसरा भाग येईल याची अनेकांना उत्सुकता होती. आताही ‘दंबग ३’ ची अधिकृत घोषणा झाली नसली तरी देखील निर्माता अरबाज खान याच्या मते ‘दंबग ३’ ची शूटिंग २०१७च्या शेवटी सुरू करण्यात येईल व २०१८च्या ईदला तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सलमान खानने नुकतीच आगामी ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली असून हा चित्रपट २०१७च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. तर अली अब्बास जफ्फ रच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात तो कॅटरिना कैफच्या अपोझिट दिसणार आहे. हा चित्रपट ख्रिसमला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.