Join us

साऊथला निघाला सलमान? चिरंजीवीसोबत करणार काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 16:45 IST

लवकरच होणार घोषणा!!

ठळक मुद्देतूर्तास सलमान त्याच्या ‘राधे’ या सिनेमात बिझी आहे. 

लॉकडाऊनमुळे अख्खा देश ठप्प आहे. बॉलिवूड, साऊथ इंडस्ट्रीही ठप्प पडली आहे. पण आताश: लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यानंतर स्थिती नियंत्रणात येईल आणि काम पुन्हा सुरु होईल, अशी अनेकांना आशा आहे. बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीही या आशेने कामाला लागलीय. साऊथ सुपरस्टार चिरंजीवी हे सुद्धा त्यांचा आगामी सिनेमा ‘आचार्य’च्या कामाला लागले आहेत. तूर्तास ‘आचार्य’बद्दल एक मोठी बातमी कानावर येतेय. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एका स्पेशल भूमिकेत दिसणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आचार्य’च्या निर्मात्यांनी अलीकडे याबद्दल सलमानला विचारणा केली होती. सलमानने अद्याप त्यांना होकार कळवला नसला तरी आपल्याला नकार मिळणार नाही, असा निर्मात्यांचा विश्वास आहे.हा चित्रपट सुजीत दिग्दर्शित करणार असून चिरंजीवी व साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल यात लीड रोलमध्ये आहेत. ‘आचार्य’ हा मल्याळम सिनेमा ‘लूसिफेर’चा रिमेक आहे. ‘लूसिफेर’मध्ये अभिनेता पृथ्वीराजने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘आचार्य’मध्ये हीच भूमिका सलमानने करावी, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

तूर्तास सलमान त्याच्या ‘राधे’ या सिनेमात बिझी आहे. लॉकडाऊनच्या आधी अनेक दिवसांपासून या सिनेमाचे शूटींग सुरु होते. मात्र लॉकडाऊनमुळे हे शूटींग थांबले. साहजिकच ‘राधे’ रखडला. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर सलमान सर्वप्रथम ‘राधे’ हातावेगळा करणार आहे. आता ‘राधे’ हातावेगळा केल्यानंतर सलमान साऊथकडे मोर्चा वळवतो का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :सलमान खान