दरम्यान, सलमानने मीडियाला सांगितले होते की, यावर्षी तो कुठल्याही प्रकारची पार्टी करणार नाही. त्याचबरोबर बर्थ डे सेलिब्रेशनही करणार नाही. परंतु त्याने सरप्राइज देत या पार्टीचे आयोजन केले. सलमानच्या बर्थ डे पार्टीविषयी जेव्हा अभिनेत्री स्नेहा उलाल हिला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, सलमान खरोखरच कुठलीही पार्टी देऊ इच्छित नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्याने हा प्लान केला. मलाही दोन दिवसांपूर्वीच त्याने इन्व्हाइट केले. जवळपास ७५ सेलिब्रिटी पार्टीत उपस्थित होते.
रात्री सुरू झालेल्या या पार्टीत सलमानने केक कटिंग सेरेमनी केली नाही. स्नेहाने सांगितले की, सलमानची बहीण अर्पिता खान डिजर्ट आणि केकची प्रचंड शौकीन आहे. दरवर्षी तिच सलमानच्या बर्थ डेचा केक च्वॉइस करीत असते. यावेळेसदेखील केक आणण्यात आला होता, परंतु ते कापला नाही. सलमान गेस्टसोबत खूप बिझी होता. त्यामुळे केक कापणे तो विसरला. अन्यथा १२ वाजताच केक कापला गेला असता.
स्नेहाने पुढे सांगितले की, सलमानने पार्टीत गेस्टकरीता पूल टेबल ठेवण्यात आला होता. त्यामुळे पार्टीत उपस्थित असलेले बहुतांश गेस्ट आपल्या संधीच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते.