Join us

सलमान खानने लग्न न करण्यामागे दिले होते विचित्र कारण, म्हणाला होता- तेव्हाच लग्न करेन जेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 19:39 IST

लमान खान 'अंतिम - द फायनल ट्रूथ' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

लग्नाच्या प्रश्नामुळे सलमान खान नेहमीच त्रस्त असतो. 'मैने प्यार किया' या सिनेमातून त्याने पदार्पण केल्यापासून त्याची लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत राहिली. त्याचे नाव अनेक को-स्टार्ससोबत जोडण्यात आले आहे. त्याच्या चाहत्यांना वाटते की त्याचं लग्न होईल. मात्र सलमान एकदा म्हणाला होता की हा पैशाचा अपव्यय आहे.

संगीता बिजलानीसोबत होता रिलेशनशीपमध्येएका जुन्या मुलाखतीत सलमान खानने आपल्या लग्नाबद्दल बोलला होता. सलमान खानने फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते की, तो तेव्हाच लग्न करले जेव्हा तो आपल्या पत्नीला इतके काही देऊ शकेल, जे तिला त्याच्या आईवडिलांच्या घरी मिळालेले नाही. त्यावेळी सलमान खान संगीता बिजलानीशी रिलेशनशिपमध्ये होता. या नात्याबद्दल तो खूप ओपन होता. त्याला विचारले गेले की जर मुलीशी लग्न करायचे असेल तर त्याने सांगितले की मी त्या मुलीबरोबर आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सलमान खान 'अंतिम - द फायनल ट्रूथ' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अंतिम - द फायनल ट्रुथ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेय तर सिनेमा सलमान खान प्रॉडक्शनखाली तयार होत आहे. यात आयुष शर्माच्या अपोझिट महिमा मकवाना बॉलिवूड डेब्यू करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२१ मध्ये रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सलमान खान