Independence Day 2025 : आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिवस साजरा केला जात आहे. सेलिब्रिटींनीही ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिन साजरा केला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमानने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ७९व्या स्वांतत्र्यदिनाच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना सलमानने खास गाणं गायलं आहे. "सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ता हमारा..." हे गाणं गाऊन भाईजानने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानच्या या व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. "स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा", असं कॅप्शन सलमानने या व्हिडीओला दिलं आहे. चाहत्यांनी सलमानच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सलमान खान 'बिग बॉस १९' मुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस'चं हे नवं पर्व २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाचं सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. या पर्वात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.