Join us

भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:50 IST

फोटोमध्ये त्याचे बायसेप्स पाहून तर अनेकांना विश्वासच बसत नाहीए.

अभिनेता सलमान खान (Salman Khan) अनेक महिन्यांपासून वाढलेलं पोट, सुजलेला चेहरा अशा लूकमध्ये दिसायचा. सलमानचं वजन कमालीचं वाढलेलं होतं. पण आता नुकताच त्याचा नवीन लूक समोर आला आहे. यामध्ये तो अगदीच बारीक  झालेला दिसत आहे. तसंच त्याने आर्मी कटही केलेला दिसतोय. फोटोमध्ये त्याचे बायसेप्स पाहून तर अनेकांना विश्वासच बसत नाहीए. सलमानसोबत काही सिनेमांमध्ये दिसलेल्या साजन सिंहने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. 

'रेस ३', 'भारत' या सिनेमांमध्ये सलमान खानसोबत दिसलेला अभिनेता साजन सिंहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याचं कुटुंबीय आहे. सर्वांनी सलमान खानसोबत  त्याच्या घरी फोटो काढला आहे. फोटोत सलमान छोट्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे. तो कॅमेऱ्याकडे पाहत हसत सर्वांसोबत पोज देत आहे. काळा व्ही नेक शक्ट, ब्लू पँट अशा लूकमध्ये तो दिसत आहे. यात त्याचं वजन कमालीचं घटलेलं दिसत आहे. त्याचा चेहराही एकदम आत गेल्यासारखा वाटत आहे. ५९ वर्षीय सलमानचं हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही अवाक झालेत. 

'भाई पुन्हा शेपमध्ये येतोय','सलमान एकदम तरुण दिसत आहे','हँडसम हंक' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. गेले अनेक दिवस सलमान जिममधील फोटो शेअर करत होता. बायसेप्सही फ्लॉन्ट करत होता. आता त्याच्या मेहनतीचं फळ दिसत आहे. 

सलमान खान आगामी सिनेमात सैन्य अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. गलवान घाटीत भारत विरुद्ध चीनमध्ये झालेल्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. याच सिनेमाच्या तयारीसाठी सलमानने वजन कमी केल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडव्हायरल फोटोज्