सलमान खान, शिल्पा शेट्टी हाजिर हो! राजस्थान पोलिसांनी बजावला समन्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 12:07 IST
सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. होय, वाल्मिकी समाजाविरोधात कथितरित्या जातिवाचक शब्दाचा वापर करणे सलमान ...
सलमान खान, शिल्पा शेट्टी हाजिर हो! राजस्थान पोलिसांनी बजावला समन्स!!
सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. होय, वाल्मिकी समाजाविरोधात कथितरित्या जातिवाचक शब्दाचा वापर करणे सलमान व शिल्पाला महाग पडले आहे. राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी सलमान व शिल्पाला समन्स बजावला आहे. यामुळे येत्या २२ फेबु्रवारीला या दोघांना पोलिसांसमक्ष हजर व्हावे लागेल.छोट्या पडद्यावरील ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाने वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. या कार्यक्रमात सलमान खान हाही हजर होता. जातिवाचक शब्दांचा वापर केल्याबद्दल वाल्मिकी समाजाने याप्रकरणी शिल्पा व सलमान या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत देशभरात ठिकठिकाणी शिल्पा व सलमानचे पुतळे जाळत आंदोलन उभारले होते. राजस्थानातील चुरू पोलीस ठाण्यात शिल्पा आणि सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. याप्रकरणी गंभीरपणे कारवाई करत, चुरू पोलिसांनी दोन्ही कलाकारांना समन्स जारी करत २२ फेब्रुवारीला तपास अधिकाºयांसमक्ष हजर राहण्याचे बजावले आहे.दरम्यान याप्रकरणी शिल्पाने सोशल मीडियावर माफी मागितली होती. मी वापरलेल्या शब्दाचा विपर्यास केला गेला. कुणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने मी तो शब्द वापरला नव्हता. पण तरिही माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. विविध जाती आणि पंथांचे लोक राहत असलेल्या आणि वैविध्याने नटलेल्या या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि मी त्या सर्वांचा मनापासून आदर करते, असे ट्विट शिल्पाने केले होते. सलमानने मात्र अद्याप माफी मागितलेली नाही.ALSO READ : शिल्पा शेट्टीने मागितली माफी; पण सलमान खानचे काय?असे आहे प्रकरण‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये सलमानने त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. या शोमध्ये शिल्पा परीक्षक आहे. याच कार्यक्रमात सलमान आणि शिल्पा शेट्टीने आपल्या डान्स स्टेप्सविषयी सांगताना वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावणाºया जातिवाचक शब्दाचा वापर केला होता. मी या स्टे्प्समध्ये ‘भंगी’ दिसेल, असे सलमान म्हणाला होता. यावर, मी घरी अशीच दिसते, असे शिल्पा म्हणाली होती. यामुळे वाल्मीकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. शिल्पा आणि सलमानने वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी आणि त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणीदेखील या समाजाने केली होती.