स्वत:च्या पेन्टिंग्स विकणार सलमान खान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 14:43 IST
सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. पण याशिवायही सलमान अनेक गोष्टी करत असतो. होय, यापैकीची एक गोष्ट ...
स्वत:च्या पेन्टिंग्स विकणार सलमान खान!
सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. पण याशिवायही सलमान अनेक गोष्टी करत असतो. होय, यापैकीची एक गोष्ट म्हणजे, पेन्टिंग. सलमानला पेन्टिंगचा छंद आहे. त्याचे हे टॅलेन्ट तुम्हीही जाणतात. सलमान सुंदर पेन्टिंग बनवतो. सलमानने करिना कपूर, त्याची बहीण अलवीरा खान, बीना काक, महेश मांजरेकर अशा सगळ्यांना आपल्या पेन्टिंग गिफ्ट दिल्या आहेत. पण आता सलमानच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आकार घेते आहे. ही कल्पना म्हणजे, स्वत:च्या पेन्टिंग्स विकण्याची. होय, आपल्या पेन्टिंग्स विकण्याचा विचार सलमानने चालवला आहे आणि यातून उभा राहणारा पैसा तो चॅरिटीला देणार आहे.काही दिवसांपूर्वी सलमानच्या एका चाहत्याने त्याची पेन्टिंग एक कोटी रूपयाला विकत घेती होती. ही रक्कम सलमानने ‘बीर्इंग ह्युमन’ चॅरिटीला दिली होती. अशाच पद्धतीने पेन्टिंग विकून चॅरिटीसाठी आणखी पैसा उभा करण्याचे सलमानचे प्रयत्न आहे.ALSO READ : 'BeingSmart' : सलमान खान लॉन्च करणार स्मार्टफोन!लवकरच सलमान स्वत:च्या ब्रॅण्डचा स्मार्टफोनही लॉन्च करणार आहे. हा स्मार्ट फोन ‘बीर्इंग ह्युमन स्टोर्स’मध्ये सहजपणे उपलब्ध होईल. विशेष म्हणजे याची किंमतही सर्वांना परवडेल, अशी असणार नाहीय. मध्यंतरी सलमानने ‘बीर्इंग ह्युमन’ अॅप लाँच केले होते. त्यानंती तो ‘बीर्इंग ह्युमन’ बाईक लाँच करणार अशी बातमीही आली होती. सलमान खानने २००७ साली गरीबांची मदत करण्यासाठी ‘बीर्इंग ह्युमन’ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून सलमान हजारो लोकांना मदत केली आहे.‘बीर्इंग ह्युमन’च्या माध्यमातून कठीण परिस्थितीत जगणाºया लोकांना आरोग्य व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देते. सुमारे ५० कोटी रुपयांची मदत आतापर्यंत सलमानने आपल्या चाहत्यांना केली आहे. यात गरीब मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांचा देखील समावेश आहे.