Join us

​रणबीर कपूरसोबत फोटोशूट करण्यास सलमान खानने का दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 14:57 IST

सलमान खान आणि रणबीर कपूर या दोघांची मैत्री शक्य आहे? भविष्याचे आम्हाला ठाऊक नाही. पण तूर्तास तरी नाही. रणबीर ...

सलमान खान आणि रणबीर कपूर या दोघांची मैत्री शक्य आहे? भविष्याचे आम्हाला ठाऊक नाही. पण तूर्तास तरी नाही. रणबीर सलमानला जराही भावत नाही. याचा ताजा पुरावा म्हणजे, अलीकडे सलमानने दिलेला नकार. होय, अलीकडे सलमानला म्हणे एका फोटोशूटची आॅफर आली होती. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, वरूण धवन असे अनेक स्टार्स या फोटोशूटमध्ये असणार होते. पण सलमानने म्हणे या फोटोशूटला स्पष्ट शब्दांत नकार दिला. याचे कारण होते रणबीर कपूर. होय, या फोटोशूटमध्ये रणबीर कपूरही आहे, हे सलमानला कळले आणि त्याचे नाव ऐकताच सलमानने एका क्षणात नकार कळवला. त्यामुळे या फोटोशूटमध्ये सलमान नाहीयं, हे नक्की झालेय.आता रणबीरचे नाव ऐकल्यावर सलमानने नकार का दिला? याचे उत्तर आम्ही द्यावे आणि तुम्ही ते ऐकावे, असे होऊच शकत नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. याचे कारण आहे कॅटरिना कैफ. होय, सलमानला सोडून कॅटरिना रणबीरच्या प्रेमात बुडाली होती. (अर्थात पुढे रणबीर व कॅटरिनाचेही ब्रेकअप झाले.) या गोष्टीचा राग सलमानच्या मनात असणारच. याच्या खूपवर्षे आधी सलमानने रणबीरला एका नाईट क्लबमध्ये कथितरित्या मारहाण केली होती. तेव्हा रणबीर चित्रपटात यायचा होता. खरे तर सलमान रणबीरचे वडिल ऋषी कपूर यांचा प्रचंड आदर करतो. पण रणबीरबद्दल मात्र सलमानच्या मनात जराही प्रेम नाही.तथापि  ‘अजब प्रेम की गजब कहानी’मध्ये रणबीर व सलमानने स्क्रीन शेअर केली होती. सलमानचा या चित्रपटात कॅमिओ होता. विशेष म्हणजे याच चित्रपटाच्या सेटवर रणबीर कॅटरिनाच्या प्रेमात पडला होता.   आता रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यावर कॅटरिना पुन्हा एकदा सलमानच्या जवळ आली आहे. अशास्थितीत रणबीरसोबत काम करणे कॅटरिनाला डिवचण्यासारखे झाले असते, कदाचित म्हणूनही सलमानने रणबीरसोबत काम करण्यास नकार दिला असावा. ALSO READ : सलमान खानबद्दल काय आहेत कॅटरिना कैफच्या भावना?