Join us

इंदर कुमारच्या श्रद्धांजली सभेकडेही सलमान खानने फिरविली पाठ; पत्नीचा आक्रोश बघून हळहळली मने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 17:18 IST

‘तुमको न भूल पाऐंगे’, ‘वॉण्टेड’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत काम करणारा अभिनेता इंदर कुमार याच्या मृत्यूची ...

‘तुमको न भूल पाऐंगे’, ‘वॉण्टेड’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत काम करणारा अभिनेता इंदर कुमार याच्या मृत्यूची बातमी बॉलिवूडकरांना हादरवणारी ठरली. वयाच्या ४४व्या वर्षी इंदरने या जगाचा निरोप घेतल्याने, त्याच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणे अजूनही अनेकांना अवघड होत आहे. हृदयविकाराने मृत्यू झालेल्या इंदरची ही अचानक एक्झिट अनेकांना चटका लावून गेली आहे. तर सलमानचा संपूर्ण परिवाराच इंदरच्या मृत्यूमुळे शॉकमध्ये आहे. परंतु इंदरच्या अंत्ययात्रेत अन् श्रद्धांजली सभेकडे सलमानसह त्याच्या परिवारातील इतर सदस्यांनी पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या सोमवारी जुहूच्या इस्कॉन टेम्पलमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या सभेत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. मुकेश ऋषी, रजा मुराद, रोनित रॉय, सुनील पाल, बिंदू दारा सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान खानही श्रद्धांजली सभेत उपस्थित राहील, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु त्याने श्रद्धांजली सभेकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक सलमान आणि इंदरची मैत्री सर्वश्रुत होती. सलमान इंदरला सख्ख्या भावाप्रमाणे समजत होता. इंदरच्या कठीण प्रसंगात सलमान खाननेच त्याला साथ दिली होती. मात्र, अशातही सलमान इंदरच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला नव्हता, शिवाय श्रद्धांजली सभेकडेही त्याने पाठ फिरविली. सभेत इंदरच्या पत्नीचा आक्रोश बघून उपस्थितांची मने हळहळली. मीडिया रिपोर्टनुसार इंदरची मुलगी खुशी हिने इंदरच्या मृत्यूच्या दुसºया दिवशी केक कापून वाढदिवस साजरा केला. खुशी इंदरची पहिली पत्नी सोनल कारिया हिची मुलगी आहे. सोनलने मुलीच्या वाढदिवसाचे काही फोटोज् फेसबुक अकाउंटवर शेअर केले होते. नंतर तिने डिलीटही केले. नुकतेच सोनलने इंदरविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले. सोनलच्या मते इंदरचे ईशा कोप्पीकर हिच्याशी नाते होते. लग्नानंतरही तो तिला विसरू शकला नव्हता.  इंदरवर बलात्काराचा गुन्हा असल्यामुळचे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. तसेच नशेच्या आहारी गेल्याने त्याचा त्याच्या करिअरवर परिणाम झाला होता. मात्र अभिनेता सलमान खान याने त्याला मदतीचा हात दिल्याने तो काही काळ सावरला होता. दरम्यान, इंदरच्या श्रद्धांजली सभेत उपस्थितांकडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी इंदरची पत्नी पल्लवीचा आक्रोश काळजाला ठेच पोहोचविणारा होता.