Join us  

Salman Khan: ‘मैनें प्यार किया’चं ऑडिशन अन् सलमान, ३३ वर्ष जुन्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:49 AM

Salman Khan, Maine Pyar Kiya : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'किसी का भाई,किसी की जान' हा सिनेमा येत्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. सध्या भाईजान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशात सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'किसी का भाई,किसी की जान' हा सिनेमा येत्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. सध्या भाईजान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशात सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय,हा व्हिडीओ आहे 'मैने प्यार किया' या सिनेमातील ऑडिशनचा. तब्बल ३३ वर्षांनी 'मैने प्यार किया' सिनेमासाठी सलमानने दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

सलमान खानने 1988 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘बीवी हो तो ऐसी’ हा त्याचा पहिला सिनेमा. पण त्याचा हा पहिलाच सिनेमा सुपरडुपर फ्लॉप झाला. यानंतर पुढच्या वर्षी सलमानचं नशीब फळफळलं आणि त्याला ‘मैनें प्यार किया’ हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतलं. या सिनेमात सलमानने साकारलेली प्रेमची भूमिका प्रचंड गाजली. या सिनेमासाठी सलमानने ऑडिशन दिलं होतं.

व्हायरल व्हिडीओत २२ वर्षाच्या सलमानने ब्ल्यू कलरचा टी-शर्ट घातलेला आहे. त्याच्या हातात गिटार आहे. गुलाबाचे फुल घेऊन तो रोमॅन्टिक डायलॉग बोलताना दिसतोय. तेव्हा सलमान आजच्या सारखा सुपरस्टार नव्हता. तो दिसायचा तो बहुतेक जाहिरातींमध्ये. ‘लखानी’ची त्याची जाहिरात पाहून सूरज बडजात्या यांनी त्याला ‘मैनें प्यार किया’च्या स्क्रिन टेस्टसाठी बोलवलं. असं म्हणतात की, या चित्रपटासाठी भाग्यश्रीला १ लाख रूपये तर सलमानला केवळ ३० हजार रूपये मानधन मिळालं होतं.

तूर्तास सलमानच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सलमान कधी कधी फारच इनोसन्ट वाटतो, असं एकाने लिहिलं आहे.ब़ॉलिवूड आणि भारताला सगळ्यात हॅन्डसम आणि स्टायलिश फॅशन ट्रेन्ड सेटर दिला म्हणून राजश्री प्रॉडक्शनचे धन्यवाद, असं एकाने लिहिलं आहे.    

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड