बॉलिवूडचा दबंग खान सलमान कोरोना व्हायरसमुळे सुरू केलेल्या लॉकडाउनच्या सुरूवातीपासूनच लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओत तो पनवेलच्या फार्महाऊसवर कुटुंबातील सदस्यांसोबत बैलगाडी व टेम्पोमध्ये किराणा सामान भरताना दिसत होते. आता पुन्हा एकदा सलमान लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. यावेळेस त्याने नवीन फंडा आजमवला आहे.
लॉकडाऊनच्या काळात हजारोंच्या संख्येत मजूर पायी अनेक किलो मीटरचा प्रवास करत आहेत. अशा मजुरांच्या मदतीसाठी सलमान खान धावून आला आहे. सलमान खानची बिइंग ह्युमन ही सामाजिक संस्था असून या संस्थेमार्फत तो समाजसेवा करत असतो. पण आता त्याने बिइंग हंगरी नावाचा एक ट्रक सुरू केला आहे.
सोशल मीडियावर सलमान खानच्या एका चाहत्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये मजुरांसाठी धान्य देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
सलमान खानने बॉलिवूडमधील जवळपास 25 हजार दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कामगार व गरीबांची मदत करत आहेत. त्यांना आर्थिक मदतीसोबतच गरजेचं सामानदेखील देत आहे. याशिवाय ऑल इंडिया स्पेशल आर्टिस्ट्स एसोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या 45 कलाकारांच्या बँक अकाउंटमध्ये तीन-तीन हजार रुपये जमा केले आहे. या सर्वांनी त्याचे आभार मानले आहेत.