सलमानने केली शाहरुखची पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 12:06 IST
सलमान खान त्याच्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. इंडस्ट्रीमध्ये जर त्याच्या ‘गुड बुक’मध्ये कोणी असेल तर तो त्यांच्यासाठी काहीही करायला ...
सलमानने केली शाहरुखची पाठराखण
सलमान खान त्याच्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. इंडस्ट्रीमध्ये जर त्याच्या ‘गुड बुक’मध्ये कोणी असेल तर तो त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो.परंतु, शाहरुख आणि त्याच्यामध्ये मध्यंतरी बरीच वर्षे अबोला होता. आता मात्र हे ‘करण-अर्जुन’ पुन्हा पक्के मित्र झाले आहेत याचा पुन्हा एक पुरावा समोर आला.‘सुल्तान’ आणि ‘रईस’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. दोन मोठे खान प्रथमच एकमेकांशी टक्कर घेणार म्हणून इंडस्ट्रीमध्ये जोरदार वातावरण तापले होते.पण शाहरुखने मग ‘रईस’चे प्रदर्शन पुढे ढकलते येत्या जानेवारी महिन्यात नेले. त्यामुळे शाहरुख सलमानला घाबरला अशी चर्चा सुरू झाली.मात्र, सलमान म्हणतो की, शाहरुखने मला घाबरून नाही तर, त्याच्या चित्रपट पूर्ण झाला नसल्याने रिलिट डेट पुढे ढकलली. मुळात दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करणे निर्मात्यांसाठी नुकसानदायक ठरेल. त्यामुळे अशा अफवांना बंद करा!