Join us  

 हुड हुड दबंग...दबंग...दबंग...! भाईजानचे चाहते झालेत क्रेजी, सेटवरचे फोटो व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 10:48 AM

सलमान खानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले नि भाईजानचे चाहते अक्षरश: ‘सैराट’ झालेत. आपला चुलबुल पांडे परततोय म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मग काय,‘दबंग 3’च्या सेटवरचे एकापाठोपाठ एक अनेक फोटो लीक होणे सुरु झाले.

ठळक मुद्दे लवकरच सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भारत’ हातावेगळा केल्यावर सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले. ‘दबंग 3’ पूर्ण होताच सलमान ‘इंशाअल्लाह’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात बिझी होणार आहे.

सलमान खाननेदबंग 3’चे शूटींग सुरु केले नि भाईजानचे चाहते अक्षरश: ‘सैराट’ झालेत. आपला चुलबुल पांडे परततोय म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मग काय,‘दबंग 3’च्या सेटवरचे एकापाठोपाठ एक अनेक फोटो लीक होणे सुरु झाले.काल ‘दबंग 3’च्या शूटींगचा पहिला दिवस होता. खुद्द सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु झाल्याची गोड बातमी शेअर करत, स्वत:चा  ‘हुड हुड दबंग स्टाईल’ फोटोही शेअर केला होता. सलमानने ही बातमी दिली आणि चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. यानंतर ‘दबंग 3’च्या सेटवरचे फोटो शेअर करण्याचा धडाका सुरु झाला. केवळ इतकेच नाही तर ‘दबंग 3’चा सेट कसा झाला, कसा सजला म्हणजे, शूटींग सुरु होण्याचे फोटोही चाहत्यांनी शेअर केलेत.  

इंदूरमध्ये ‘दबंग 3’च्या पहिल्या शेड्यूलचे शूटींग सुरु झाले आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभु देवा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय. प्रभुदेवाने याआधी सलमानचा पहिला ‘१०० करोडी’ चित्रपट ‘वॉन्टेड’ दिग्दर्शित केला होता. ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने सलमानच्या करिअरला एक वेगळी कलाटणी दिली होती.

‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे. सोनाक्षीने ‘दबंग’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘दबंग 2’मध्येही सोना दिसली. आता ‘दबंग 3’मध्येही सोनाचा जलवा दिसणार आहे. सोनाक्षीसोबतच महेश मांजरेकरची मुलगी अश्वनी मांजरेकर ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.  अर्थात चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भारत’ हातावेगळा केल्यावर सलमानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले. ‘दबंग 3’ पूर्ण होताच सलमान ‘इंशाअल्लाह’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात बिझी होणार आहे.

टॅग्स :सलमान खानदबंग 3