Join us

सलमान खानकडे आहेत जगातील सर्वांत महागडे कुत्रे; त्यांच्यावरील खर्च ऐकाल तर धक्का बसेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 14:38 IST

बॉलिवूडमध्ये एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून सलमान खानला ओळखले जाते. चित्रपट आणि बीइंग ह्यूमन या कंपनीच्या माध्यमांतून ...

बॉलिवूडमध्ये एका चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून सलमान खानला ओळखले जाते. चित्रपट आणि बीइंग ह्यूमन या कंपनीच्या माध्यमांतून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. राजेशाही जीवन जगणाºया सलमानचे छंदही लॅविश आहेत. आपले छंद पूर्ण करण्यासाठी तो त्यावर कोट्यवधी रुपयांची उधळणही करतो. सलमानला कुत्र्यांचे पालन करण्याचा छंद आहेत. त्यासाठी जगातील सर्वात महागड्या प्रजातीचे त्याच्याकडे कुत्रे आहेत. या कुत्र्यांवर तो महिन्याकाठी लाखो रुपयांची उधळण करतो. सलमानकडे ‘मायसन’ आणि ‘मायजान’ नावाचे दोन कुत्रे होते. ज्यांचे २०१६ मध्ये निधन झाले. कुत्र्यांच्या निधनामुळे सलमान खूपच अपसेट झाला होता. कारण सलमान या दोन्ही कुत्र्यांवर जिवापाड प्रेम करीत होता. सलमान ‘मायसन आणि मायजानला बºयाचदा ‘बिग बॉस’च्या सेटवरही नेले होते. सलमान त्याच्या कुत्र्यांविषयी खूपच पजेसिव्ह होता. सलमानच्या मते, त्याला त्याच्या या कुत्र्यांकडून धैर्य आणि संयम शिकायला मिळाले. त्यांनी मला अनकंडिशनल प्रेम करायला शिकविले. सध्या सलमानकडे लॅब्राडोर, सेंट बर्नार्ड आणि नेपोलिटन मिस्टफ ब्रीडचे कुत्रे आहेत. त्यांची नावे ‘मोगली, सॅण्डी आणि मायलव्ह’ असे आहेत. सलमानचे हे कुत्रे जगातील सर्वात महागड्या प्रजातींपैकी आहेत. त्याने हे कुत्रे प्रत्येकी दोन लाख रुपयांना खरेदी केले आहेत. प्रत्येक कुत्र्यावर महिन्याकाठी सुमारे ५० हजार रूपये खर्च केला जातो. २०११ मध्ये सलमानने त्याच्या ‘मायसन आणि मायजान’ या कुत्र्यांसोबतचा एक फोटो ‘बीएसपीसीए’ला डोनेट केला होता. ही संस्था पशू कल्याणासंदर्भात जनजागृती करण्याचे काम करते. जेव्हा सलमान ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे शूटिंग करीत होता, तेव्हा त्याचा ‘सॅण्डी’ नावाचा कुत्रा आजारी पडला होता. तेव्हा त्याने चित्रपटाची शूटिंग थांबवून राजस्थानातून थेट घर गाठले होते. सलमान सोशल मीडियावरही कुत्र्यांसोबतचे फोटोज् शेअर करीत असतो. सलमानचे कुत्र्यांप्रती असलेले प्रेम खरोखरच वाखण्याजोगे आहे.