Join us  

सलमान खानचे फार्म हाऊस वादात, वन विभागाने बजावले नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 10:15 AM

सलमान खान आणि वाद हे जणू आता समीकरण झाले आहे. आता पुन्हा एकदा सलमान एका कायदेशीर प्रकरणात अडकलाय. 

सलमान खान आणि वाद हे जणू आता समीकरण झाले आहे. आता पुन्हा एकदा सलमान एका कायदेशीर प्रकरणात अडकलाय. होय, अलीकडे एका वयोवृद्ध दाम्पत्याने सलमान व त्याच्या कुटुंबावर बळजबरी करत असल्याचा आरोप केला होता. सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊच्या अगदी लागून या वयोवृद्ध दाम्पत्याची जागा आहे. या जागेवर त्यांनी बांधकाम करायला घेतले. पण खान कुटुंबाने आपल्या दबावाचा वापर करत, त्यांच्या मार्गात एकापाठोपाठ एक अशा अनेक अडचणी निर्माण केल्यात, असा आरोप आहे. आता याच संदर्भाने एक ताजी बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र वन विभागाने सलमानच्या पनवेलस्थित फार्म हाऊसमधील कथित अवैध बांधकामासंदर्भात नोटीस जारी केले आहे.

खान कुटुंबाचे वजापूर येथे अर्पिता फार्म्स नावाचे मोठे अलिशान फार्महाऊस आहे. २००३ मध्ये या भागाला पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील घोषित करून, या क्षेत्रातील बांधकामांवर बंदी लादण्यात आली होती. मात्र असे असतानाही खान कुटुंबाने या फार्म हाऊसवर अनेक प्रकारचे नवे बांधकाम केले. त्यामुळे वन नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, याप्रकरणी सलमानच्या कुटुंबाला नोटीस जारी करण्यात आल्याचे कळते. ३ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र सरकारच्या आदेशान्वये अर्पिता फार्म्समध्ये बांधकाम करण्यात आले होते. पण वन विभागाला आत्ता कुठे जाग आली आहे.वनअधिकाऱ्याची बदली?सलमानच्या कुटुंबाला नोटीस जारी करणारे वन अधिकारी एस एस कापसे यांची बदली करण्यात आल्याचेही कळतेय. कापसे यांनी आपल्या बदलीवर आक्षेप घेत, ती रोखण्याची मागणी केली असल्याचेही समजतेय.१७ जुलैला सुनावणीवनविभागाच्या नोटीसमुळे सलमानची डोकेदुखी वाढली असताना, येत्या १७ जुलैला त्याच्या काळवीट शिकार प्रकरणाची जोधपूर न्यायालयात सुनावणी आहे. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवत न्यायालयाने ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या सलमान जामीनावर आहे.

 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडनवी मुंबई