जेव्हा बिग बॉसचा ११ वा सीजन सुरू झाला तेव्हा जुबेर खानने घरातील सदस्यांशी उद्धट वागताना प्रचंड शिवीगाळ केली होती. जुबेरची घरातील वागणूक सलमानला त्याच्यावरी राग अनावर झाला होता. सलमान जेव्हा विकेण्ड का वारमध्ये आला तेव्हा त्याने जुबेरची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्याचबरोबर सलमानने सर्वांसमोर जुबेरला ‘कुत्ता बना के छोडूंगा’ असे म्हटले होते. तसेच त्याची बिग बॉसच्या घराबाहेर हकालपट्टीही केली होती. दरम्यान, जुबेरने हाच मुद्दा घेऊन सलमान खानवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सलमान त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करीत असतानाच गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या आनंदावर काहीसे पाणी फेरले गेले असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. सलमानने त्याचे मित्र आणि बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींना नुकतीच एक पार्टी दिली. पार्टीत कॅटरिनासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. महेंद्रसिंग धोनी यानेदेखील पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत पार्टीत हजेरी लावली होती.