आजुबाजूला सुरु असलेली ठगबाजी, फसवणुकीच्या प्रकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना कायम सतर्क राहावे लागते. अनेक लोक, अनेक समूह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावावर ठगबाजी करतात. फसवणुकीचे अनेक प्रकार यातून समोर येतात. असेच एक प्रकरण तूर्तास उघड झाले आहे. विशेष म्हणजे, खुद्द बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या नावाने फसवणुकीचा हा प्रकार सुरु होता. पण भाईजान वेळीच सावध झाला आणि त्याने याबद्दल आपल्या चाहत्यांना सतर्क केले.होय, भाईजान सलमानने आपल्या सोशल अकाऊंटवर एका इव्हेंटचे बॅनर शेअर केले आहे. या बॅनरवर सलमानशिवाय आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो आहेत. हा इव्हेंट सलमानच्या बीइंग ह्यूमन फाऊंडेशनद्वारे आयोजित केला जात असल्याचा दावा या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. एवढेच नाही तर खुद्द सलमान या इव्हेंटला हजर राहणार असल्याचा दावाही यात केला गेला आहे.
OMG! सलमान खानच्या नावावर सुरु होती ठगबाजी; भाईजानने वेळीच केले सावध!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 10:17 IST
आजुबाजूला सुरु असलेली ठगबाजी, फसवणुकीच्या प्रकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना कायम सतर्क राहावे लागते. अनेक लोक, अनेक समूह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावावर ठगबाजी करतात. फसवणुकीचे अनेक प्रकार यातून समोर येतात. असेच एक प्रकरण तूर्तास उघड झाले आहे.
OMG! सलमान खानच्या नावावर सुरु होती ठगबाजी; भाईजानने वेळीच केले सावध!!
ठळक मुद्देतूर्तास सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.