अन् आॅटोरिक्षाने घरी पोहोचला सलमान खान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 10:52 IST
सलमान खान स्टारपद मिरवत नाही तर ते विसरून जगतो. ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास कालचेच घ्या. होय, अगदी कालचे. सध्या ...
अन् आॅटोरिक्षाने घरी पोहोचला सलमान खान!
सलमान खान स्टारपद मिरवत नाही तर ते विसरून जगतो. ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास कालचेच घ्या. होय, अगदी कालचे. सध्या सलमान त्याच्या ‘ट्यूबलाईट’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटच्या निमित्ताने काल रात्री सलमान खान मेहबूब स्टुडिओत आला होता. सलमानची एक्स गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ ही सुद्धा तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या स्टुडिओत आली होती. मग काय, इव्हेंट संपला आणि सलमान व कॅटरिना स्टुडिओबाहेर पडले. पण बाहेरचे दृश्य पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आता स्टुडिओबाहेर असे काय घडले, असा विचार तुम्ही करत असाल तर ऐका! त्याचे झाले असे की, सलमान कॅटरिनाला तिच्या गाडीपर्यंत सोडायला गेला. यानंतर जे झाले, त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. होय, कॅटरिनाला तिच्या गाडीपर्यंत ड्रॉप केल्यानंतर सलमान स्वत: आॅटो रिक्षात बसून घरी रवाना झाला. यावेळी निर्माते रमेश तौरानी हेही त्याच्यासोबत होते. यावेळचे सलमान व कॅटरिनाचे काही फोटो आमच्या हाती लागले आहेत. आता सलमानवर आॅटो रिक्षात जाण्याची वेळ का यावी? तर रस्त्यावर जमलेली गर्दी. कॅटरिनाला ड्रॉप करत असतानाच काही चाहत्यांची नजर सलमानवर पडली. मग काय, अगदी काही क्षणात रस्त्यावर सलमानला पाहायला गर्दी जमली. रत्यावरची वाढती गर्दी पाहून सलमानने त्याठिकाणाहून काढता पाय घेणेच पसंत केले. घाईघाईत जवळच्याच आॅटोरिक्षाला त्याने थांबवले आणि लगेच त्यात बसून आपल्या घराकडे रवाना झाला. लवकरच सलमान व कॅटरिनाचा ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.