Join us

Salman Khan blackbuck poaching case:सलमानच्या जामिनावर थोडाच वेळात होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:30 IST

1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.  सलमान खानला आज जामिन ...

1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.  सलमान खानला आज जामिन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.काल रात्री अचानक राजस्थानमधील 87 न्यायाधिशांची बदली झाली आहे. त्यामध्ये सलमानच्या केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांचाही समावेश आहे.त्यामुळं सलमानला आज जामीन मिळणार की सोमवारी हे काही वेळेतच स्पष्ट होणार आहे.सलमानच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या रातोरात बदली झाली आहे.  एप्रिल महिन्यात नेहमी न्यायाधीशांची बदली होते. पण आता एकाचवेळी झालेल्या बदलीमुळे सलमानच्या जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे.तुर्तास सर्वांचे लक्ष आता पुढील सुनावणीकडे लागले आहे.थोड्याचवेळात सलमानच्या जामिनावर निर्णयाची शक्यता आहे.Also Read:सलमान खानला गाजाआड पोहोचविणाऱ्या ‘या’ व्यक्तीबद्दल झाला मोठा खुलासा!काळवीट शिकार प्रकरणात अभिनेत्री तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यावरही आरोप होता. परंतु गुरुवारी (५ एप्रिल) जोधपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना दोघींचीही निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे, दोघीही या प्रकरणातून एका खास कारणामुळे निर्दोष सुटल्या. होय, सुनावणीदरम्यान एक प्रमुख साक्षीदार त्यांना ओळखण्यास अपयशी ठरला. कारण त्यांनी पांढºया रंगाचा सूट घातल्यानेच त्यांची ओळख पटविता आली नाही. यावेळी या साक्षीदाराने सैफ अली खानला ओळखले, मात्र हे सिद्ध होऊ शकले नाही की बंदुकीतून गोळी सैफने चालविली होती की त्याने सलमानला असे करण्यास उद्युक्त केले होते.