सलमान खानने तुरुंगात मानला आसारामबापूचा सल्ला! आता कधीच करणार नाही ‘हे’ काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 10:16 IST
सलमान खान जामिनावर तुरूंगाबाहेर आला. पण शिक्षा ठोठावल्यानंतरच्या दोन रात्री त्याला जोधपूर मध्यवर्ती तुरूंगाच्या बराक क्रमांक २ मध्ये घालवाव्या ...
सलमान खानने तुरुंगात मानला आसारामबापूचा सल्ला! आता कधीच करणार नाही ‘हे’ काम!
सलमान खान जामिनावर तुरूंगाबाहेर आला. पण शिक्षा ठोठावल्यानंतरच्या दोन रात्री त्याला जोधपूर मध्यवर्ती तुरूंगाच्या बराक क्रमांक २ मध्ये घालवाव्या लागल्या. सलमानला ज्या बराकीत ठेवण्यात आले होते, त्याच्याच बाजुच्या बराकीत लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेत असलेल्या आसारामबापूला ठेवण्यात आले होते. यादरम्यान सलमान व आसाराम एकमेकांना भेटले, बोलले आणि तुरूंगातील या भेटीचे फलित म्हणजे, सलमानने एक व्यसन कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला. होय, आसारामबापूने सलमानला सिगारेटचे व्यसन कायमचे सोडून दे, असा सल्ला दिला आणि सलमानने लगेच आसारामबापूचा हा सल्ला मानत, यापुढे कधीही सिगरेट न पिण्याचा निर्धार केला. निश्चितपणे सलमानचा हा निर्धार त्याच्या आरोग्यासाठी चांगला आहे. आता केवळ हा निर्धार सलमान कसा पूर्ण करतो, ते बघायचे आहे. ALSO READ : सलमान खानने बदलले ‘या’ अभिनेत्याचे लक; इमोशनल होऊन इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘लव यू मामू’!काळवीट शिकार प्रकरणी गत ५ एप्रिलला जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती तर सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, निलम या अन्य आरोपींची निर्दोष सुटका केली होती. यानंतर काल शनिवारी सत्र न्यायालयाने सलमानला जामीन मंजूर केला आणि यानंतर काही तासांत सलमान तुरूंगाबाहेर आला. तुरुंगातून बाहेर येताच, सलमान एका चार्टर्ड प्लेनने मुंबईला रवाना झाला. मुंबईत हजारो चाहते सलमानच्या घरासमोर जमले होते. या चाहत्यांना भेटताना सलमान भावूक झालेला दिसला. आता घरी जा आणि निवांत झोपा, असे सलमानने आपल्या सगळ्या चाहत्यांना सांगितले. काल रात्रीपासून सलमानला भेटण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स त्याच्या घरी येत आहेत. कॅटरिना कैफ सलमानला भेटायला पोहोचलेली पहिली व्यक्ती होती.