Join us  

सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर, ईदला प्रदर्शित होणार सलमानचा हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 7:29 PM

दबंग 3 नंतर तुझा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आणि तो कधी प्रदर्शित होणार असे तुम्ही विचारत होता ना... हे घ्या उत्तर असे सोशल मीडियावर लिहिले आहे आणि त्याचसोबत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देराधे द मोस्ट वाँटेड भाई असे ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची निर्मिती सलमा खान आणि सोहेल खान करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे.

सलमान खानच्यादबंग 3 या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटानंतर आता ईदला देखील सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून सलमाननेच नुकतीच त्याच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ख्रिसमस चुलबुल पांडेसोबत साजरा केल्यानंतर आता ईद हा सण राधेसोबत साजरा करा असे म्हणत त्याने त्याच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

दबंग 3 नंतर तुझा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आणि तो कधी प्रदर्शित होणार असे तुम्ही विचारत होता ना... हे घ्या उत्तर असे सोशल मीडियावर लिहिले आहे आणि त्याचसोबत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  या व्हिडिओत आपल्याला दबंग या चित्रपटासोबत सलमानच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील पाहायला मिळत आहे.

 

राधे द मोस्ट वाँटेड भाई असे ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाची निर्मिती सलमा खान आणि सोहेल खान करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे.

सलमानने दबंगचा टीझर काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्यासोबत त्याने लिहिले होते की, रॉबिनहुड पांडे येतोय तुमच्या भेटीला स्वागत नाही करणार त्याचे. सलमान खानचा हा टीझर वेगवेगळ्या भाषेत रिलीज करण्यात आला होता. 'दबंग 3 20 डिसेंबर 2019 ला रिलीज होणार असून हा चित्रपट हिंदीसोबतच कन्नड, तमीळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल सलमानच्या फॅन्सना प्रचंड उत्सुकता आहे.

'दबंग 2’ या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना  ‘दबंग 3’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेचे वय ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ या दोन्ही चित्रपटांपेक्षा कमी असल्याने सलमानने या चित्रपटासाठी वजन कमी केले आहे. या सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. तसेच साऊथचा प्रसिद्ध अभिनेता किचा सुदीप व्हिलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर याच सिनेमातून महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

टॅग्स :सलमान खानदबंग 3प्रभू देवासोहेल खान