सलमान खान व कॅटरिना कैफने साईन केला आणखी एक नवा चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 12:04 IST
लवकरच ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांची सुपरहिट जोडी आपण पाहणार आहोत. यापूर्वी ...
सलमान खान व कॅटरिना कैफने साईन केला आणखी एक नवा चित्रपट!
लवकरच ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांची सुपरहिट जोडी आपण पाहणार आहोत. यापूर्वी ‘एक था टायगर’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. आता सलमान व कॅटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सलमान व कॅटने आणखी एक चित्रपट एकत्र साईन केला आहे. सध्या बॉलिवूडमध्ये याचीच चर्चा रंगली आहे. या चर्चा ख-या मानाल तर, सलमान व कॅटरिना हे दोघे पुन्हा एकदा अतुल अग्निहोत्रीच्या चित्रपटात एकत्र येणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरिस फ्लोरवर येणार असल्याचे कळतेय. म्हणजेच काय तर यावर्षीच्या डिसेंबरमध्ये सलमान व कॅटचा ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित होईल आणि पुढच्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये या दोघांचा आणखी नवा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.ALSO READ : ‘टायगर जिंदा हैं’च्या सेटवर कॅटरिना कैफविना एकाकी पडला सलमान खान!‘टायगर जिंदा है’बद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाचे आॅस्ट्रियातील शूटींग शेड्यूल पूर्ण झाले आहे. याठिकाणी एक गाणे आणि काही अॅक्शन दृश्यांचे शूटींग झाले. लवकरच मुंबईतील यशराज स्टुडिओत चित्रपटाचे सेकंड शेड्यूल सुरू होईल. हे संपल्यानंतर चित्रपटाची टीम पुन्हा एकदा आऊटडोअर शूटींगसाठी रवाना होईल. हे शूटींग पाच वेगवेगळ्या देशांत होणार असल्याने येत्या मे महिन्यापासून सलमान व कॅट या शूटींगमध्ये बिझी असतील.‘टायगर जिंदा है’ हा २०१२ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘एक था टायगर’ या सिनेमाचा सीक्वल आहे. कबीर खान यांनी ‘एक था टायगर’चे दिग्दर्शन केले होते, तर अली अब्बास जफर ‘टायगर जिंदा है’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. या चित्रपटासाठी सलमानने त्याचे २० किलो वजन कमी केले आहे.