Join us

OMG ! अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 16:56 IST

सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा भारतच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी सलमान चांगलीच मेहनत घेतोय.

ठळक मुद्दे‘भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़ भारत'मधले एका गाण्याची शूटिंग करण्यात येणार आहे

सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी सलमान चांगलीच मेहनत घेतोय. नुकताच सलमानच्या 'भारत'चा टीझर रिलीज झाला आहे. ज्यानंतर सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिनेमाच्या शूटिंग गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. रिपोर्ट नुसार लवकरच 'भारत'मधले एका गाण्याची शूटिंग करण्यात येणार आहे. ज्यात वेडिंग सीक्वेंस असणार आहे.

डीएनएच्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि कॅटरिना कैफवर हा वेडिंग सीक्वेंस शूट करण्यात येणार आहे. या सीक्वेंसला एका गाण्याप्रमाणे शूट केले जाणार आहे.  

‘भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़.  यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.   

टॅग्स :सलमान खानभारत सिनेमाकतरिना कैफ