सलमान खानने 1988 मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘बीवी हो तो ऐसी’ हा त्याचा पहिला सिनेमा. पण त्याचा हा पहिलाच सिनेमा सुपरडुपर फ्लॉप झाला. यानंतर पुढच्या वर्षी सलमानचे नशीब फळफळले आणि त्याला ‘मैनें प्यार किया’ हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतले. याच चित्रपटाचा सलमानचा एक 30 वर्षे जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, हा व्हिडीओ आहे,‘मैनें प्यार किया’च्या स्क्रिन टेस्टचा.30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटात सलमान रोमॅन्टिक रोलमध्ये दिसला होता. अभिनेत्री भाग्यश्री त्याच्या अपोझिट होती. या जोडीने प्रेक्षकांना वेड लावले आणि सलमानच्या करिअरची गाडी चालू लागली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत सलमानने ब्ल्यू कलरचा टी-शर्ट घातलेला आहे. त्याच्या हातात गिटार आहे. गुलाबाचे फुल घेऊन तो रोमॅन्टिक डायलॉग बोलताना दिसतोय.
का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 15:32 IST
‘मैनें प्यार किया’ सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतले. याच सलमानचा एक 30 वर्षे जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?
ठळक मुद्देसध्या सलमान ‘दबंग 3’च्या शूटींगमध्ये बिझी आहे.