सलमानचा ‘ट्युबलाईट’ आहे , ‘या’ हॉलिवूडपटाची कॉपी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 22:14 IST
‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’च्या यशाची गोडी चाखल्यानंतर कबीर व सलमान ही जोडी ‘ट्युबलाईट’च्या यशाची गोडी चाखण्यास उत्सूक आहे. पण भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी असलेला ‘ट्युबलाईट’ हा एका हॉलिवूडपटाचा रिमेक आहे, अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
सलमानचा ‘ट्युबलाईट’ आहे , ‘या’ हॉलिवूडपटाची कॉपी?
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. बॉलिवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान आणि चीनी अभिनेत्री झू झू अशी जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’च्या यशाची गोडी चाखल्यानंतर कबीर व सलमान ही जोडी ‘ट्युबलाईट’च्या यशाची गोडी चाखण्यास उत्सूक आहे. प्रेक्षकही तितक्याच आतुरतेने चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहेत. तेव्हा प्रेक्षकांच्या माहितीत आणखी भर घालण्याचे आमचे प्रयत्न आहेत. होय, भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी असलेला ‘ट्युबलाईट’ हा एका हॉलिवूडपटाचा रिमेक आहे, अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे. हा हॉलिवूडपट म्हणजे, ‘लिटिल बॉय’. हा चित्रपट पिता-पुत्राच्या संबंधांवर आधारित आहे. गोष्टी उशीरा वळत असल्याने यातील ‘पेपर’नावाचा मुलगा नेहमी टिंगलीचा विषय ठरत असतो. त्याचे पिता सैनिक असतात. ते युद्धावर जातात आणि बेपत्ता होतात. मग हा मुलगा आपल्या पित्याच्या शोधात एकटा बाहेर पडतो. याचदरम्यान त्याची भेट एका चीनी मुलीशी होते. सलमानच्या ‘ट्युबलाईट’मध्ये पिता-पुत्राऐवजी दोन भावांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. म्हणजे प्लॉट बदलला असला तरी स्टोरी सेम आहे. असे असताना ‘ट्युबलाईट’ प्रेक्षकांना किती व कसा भावतो, ते बघूच!!