सलमान गोविंदाच्या मैत्रीत फुट, 'पार्टनर 2' सिनेमाही लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 16:32 IST
दबंग चित्रपटातून सलमान गोविंदाच्या मुलीला लॉंच करणार होता, पण सोनक्षीला दबंग मध्ये घेतल्यामुळं दोन्ही जिवलग मित्रांमध्ये फूट पडली.राजकारणात अपयशी ...
सलमान गोविंदाच्या मैत्रीत फुट, 'पार्टनर 2' सिनेमाही लांबणीवर
दबंग चित्रपटातून सलमान गोविंदाच्या मुलीला लॉंच करणार होता, पण सोनक्षीला दबंग मध्ये घेतल्यामुळं दोन्ही जिवलग मित्रांमध्ये फूट पडली.राजकारणात अपयशी ठरल्यानंतर गोविंदाला सिनेमात काम मिळेनास झाले. सलमानने पाटर्नर मध्ये घेऊन हिरोच्या करियरला आधार दिला होता .सलमान खान सध्या यशाच्या शिखरावर आहे, तर गोविंदा एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे.बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे पाटर्नर2 द्वारे गोविंदा पुन्हा एकदा चित्रपटात स्थिरावणार असं वाटतं असतानाच एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमुळं गोविंदा-सलमान मधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. 'आ गया हिरो'च्या प्रमोशनसाठी गोविंदाने दिलेल्या एका मुलाखतीत सलमान सोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी बोलताना तो म्हणाला,सलमान खान सध्या यशाच्या शिखरावर आहे. आम्ही दोघेही एकमेकाच्या कामाचा आदर करतो, मी त्याच्या कामात आता येऊ शकत नाही, यापुढे आम्ही एकत्र कामही करू शकत नाही.गोविंदाच्या या वक्तव्यामुळं 2018 मध्ये येणारा पार्टनर 2 सिनेमाही डब्यात गेल्याच चित्रपटसृष्टीत बोलले जात आहे.