Join us  

सलमान ते अक्षयपर्यंत, जाणून घ्या या स्टार्सच्या पहिल्या सिनेमांची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:42 PM

आता जे सुपरस्टार १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात त्यांच्या पहिल्या सिनेमाने किती कमाई केली होती हे तुम्हाला माहीत आहे? नाही ना?

बॉलिवूड सिनेमांच्या कमाईची चर्चा तशी अलिकडेच जास्त व्हायला लागली आहे. पूर्वी यावर इतकी चर्चा होत नसे. आता सिनेमांचा १०० कोटींचा क्लब मागे पडून ४०० ते ५०० कोटींच्या क्लब तयार झाला आहे. पण आता जे सुपरस्टार १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात त्यांच्या पहिल्या सिनेमाने किती कमाई केली होती हे तुम्हाला माहीत आहे? नाही ना? चला जाणून घेऊ आजच्या स्टार्सच्या पहिल्या सिनेमांची कमाई...

शाहरूख खान

बॉलिवूड किंग शाहरूख खान याचा पहिला सिनेमा 'दिवाना' हा होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७.७० कोटी रूपयांची कमाई केली होती. 

आमिर खान

'कयामत से कयामत तक' हा आमिर खानचा पहिला सिनेमा होता. या सिनेमाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर ४.७० कोटी रूपयांची कमाई केली होती.

अजय देवगण

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अजय देवगण याने 'फूल औंर काटें' या सिनेमातून डेब्यू केलं होतं. त्याच्या या सिनेमाने ६.६० कोटी रूपयांची कमाई केली होती. 

अक्षय कुमार

'सौगंध' या सिनेमातून अक्षय कुमार याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या सिनेमाने १.४० कोटी रूपयांची कमाई केली होती. 

सलमान खान

बॉलिवूडच्या सर्वात गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'मैने प्यार किया'. सलमानच्या या पहिल्या सिनेमाने तब्बल १५ कोटी रूपयांची कमाई केली होती.  

टॅग्स :बॉलिवूड